आज दिवसभरात... 4 फेब्रुवारी 2018
2019-20 साठी मुंबई महापालिकेचं 30 हजार 692 कोटींचं बजेट, शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी 1600 कोटींची तरतूद
2019-20 साठी मुंबई महापालिकेचं 30 हजार 692 कोटींचं बजेट, शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी 1600 कोटींची तरतूद
पार्श्वभूमी
1. अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे राळेगणसिद्धीत जाणार, उपोषणाचा सहावा दिवस, गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ
2. पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार विरुद्ध ममता बॅनर्जी संघर्ष तीव्र, चौकशीसाठी गेलेलं सीबीआयचं पथक पोलिसांच्या ताब्यात, ममता बॅनर्जींचंही धरणं आंदोलन
3. मराठा आरक्षणविरोधी याचिकांवर आज उच्च न्यायालयात सुनावणी, आयोगाच्या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना देण्यावर राज्य सरकार भूमिका स्पष्ट करणार
4. मोदी जंगल के शेर, बाकी सब जानवर, मुंबईतल्या युवा महासंगम सभेत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, विरोधकांच्या दांड्या उडवण्याचंही वक्तव्य
5. प्रयागराजमध्ये आज कुंभमेळ्यातलं दुसरं शाही स्नान, तीन कोटींपेक्षा जास्त भाविकांच्या उपस्थितीची शक्यता, चोख पोलिस बंदोबस्त
6. कॅन्सरशी झुंज देऊन सोनाली बेंद्र पुन्हा सेटवर, जाहिरातीच्या शूटिंगचे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -