LIVE BLOG | दलित पँथरचा शिवसेनेला पाठिंबा
दलित पँथरचा शिवसेनेला पाठिंबा, पक्षाच्या अध्यक्षा आणि दिवंगत नेते नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर, भीमशक्ती-शिवशक्ती यांचे ऋणानुबंध, शिवसेनेसाठी प्रचारही करणार, मल्लिका अमर शेख यांची माहिती
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 29 Mar 2019 07:37 PM

पार्श्वभूमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक, बिहार एटीएसची चाकणमध्ये मोठी कारवाई, आरोपीकडे महत्त्वाची कागदपत्रं सापडल्यानं खळबळ2. आचारसंहिता उल्लंघनाप्रकरणी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींविरोधात काँग्रेसची तक्रार,...More
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक, बिहार एटीएसची चाकणमध्ये मोठी कारवाई, आरोपीकडे महत्त्वाची कागदपत्रं सापडल्यानं खळबळ2. आचारसंहिता उल्लंघनाप्रकरणी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींविरोधात काँग्रेसची तक्रार, तर ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये ठेवताना सीसीटीव्ही बंद केल्याचा नाना पटोलेंचा गंभीर आरोप3. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत, सुपुत्र भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी4. लोकसभेतले 83 टक्के खासदार कोट्यधीश, एडीआर अहवालात माहिती, 32 खासदारांकडून 50 कोटींहून अधिकची संपत्ती घोषित, तर 33 टक्के खासदारांवर गुन्ह्यांची नोंद5. अकरा खाती सांभाळता, मग तसं कामही करा, पानसरे हत्या प्रकरणावरुन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांना खडे बोल6. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने खातं उघडलं, अटीतटीच्या लढतीत मुंबईची बंगळुरुवर सहा धावांनी मात, शेवटचा चेंडू नो बॉल न दिल्यामुळे कोहलीची अम्पायरवर नाराजी
नीरव मोदी प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची बदली, लंडनमध्ये आज सुनावणी, केसवर परिणामाची शक्यता