LIVE BLOG | मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, दहशतवादाविरुद्ध भारताच्या प्रयत्नांना अखेर यश

मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, दहशतवादाविरुद्ध भारताच्या प्रयत्नांना अखेर यश

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 May 2019 09:45 PM
गोवा : पणजीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक, प्रत्येक आमदाराकडे पणजीमधील 3 बूथची जबाबदारी, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती
मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, दहशतवादाविरुद्ध भारताच्या प्रयत्नांना अखेर यश



वाशिम गृहरक्षक दलाच्या वाहनाला अपघात, 22 जण जखमी
#BREAKING दुष्काळ आणि गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यासंदर्भात उद्या दुपारी 12.30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक, निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल करण्याची परवानगी मिळाल्यास सर्व पालकमंत्री दुष्काळ दौऱ्यावर जाणार
#BREAKING दुष्काळ आणि गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यासंदर्भात उद्या दुपारी 12.30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक, निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल करण्याची परवानगी मिळाल्यास सर्व पालकमंत्री दुष्काळ दौऱ्यावर जाणार
गडचिरोली : भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाल्याची भीती, कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट
पुणे : जहांगीर हॉस्पिटलमधील नर्स, लॅबमध्ये काम करणारे डॉक्टर्स, सफाई कामगार सकाळपासून संपावर, जवळपास साडेतीनशे ते चारशे जण संपात सहभागी


एससी/एसटी अॅक्ट प्रकरणी सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाने फैसला राखून ठेवला, गेल्या वर्षी SC/ST अॅक्ट अंतर्गत तात्काळ अटकेला सर्वोच्च न्यायालयाने रोख लावली होती, याविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर नंतर सुनावणी होणार
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून काल मध्यरात्री 36 वाहनांची जाळपोळ, कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील घटना, दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षलवादी दादापूर गावात, संपूर्ण गावात शासनाविरोधी मजकूर लिहिलेले बॅनर
नाशिक : राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती, राज्यातील सर्व मंत्र्यांना दुष्काळी भागाचा दौरा करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उद्या मंत्रीमंडळाची तातडीची बैठक - गिरीश महाजन
‘एबीपी माझा’च्या वाचक आणि प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मानवंदना!

पार्श्वभूमी

1. चौकीदार चोर है सुप्रीम कोर्टाने मान्य केल्याचं बोलल्याबद्दल राहुल गांधींचा पुन्हा माफीनामा, प्रतिज्ञापत्रातील विसंगतीवर कोर्टाचे ताशेरे, नागरिकत्त्वाच्या मुद्यावरून गृह मंत्रालयाचीही नोटीस

2.आचारसंहिता भंगप्रकरणी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लीन चिट, वर्ध्यातल्या सभेत काँग्रेसने हिंदूंचा अपमान केल्याचं वक्तव्य

3. दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रातली आचारसंहिता शिथिल करा, राज्यातल्या लोकसभा निवडणुका संपताच मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयुक्तांना पत्र

4. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नेस वाडियांना जपानच्या कोर्टाकडून दोन वर्षांची शिक्षा, तूर्तास अटक नाही, मात्र पुन्हा कायदा मोडल्यास जेलवारी अटळ

5. आसारामपुत्र नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा, भक्त महिलेवरच्या बलात्कारप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाचा निर्णय

6. नेपाळ-चीन सीमेजवळ भारतीय लष्कराला आढळले मोठ्या पावलांचे ठसे, हिममानवाच्या अस्तित्वाच्या शक्यतेवर जोरदार खलबतं

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.