LIVE BLOG | भारताचे पाकिस्तानात घुसून 3 एअर स्ट्राईक, तिसऱ्या स्ट्राईकची माहिती देणार नाही : राजनाथ सिंह

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Mar 2019 11:50 PM
मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी शेकाप च्या जयंत पाटील यांची फिल्डिंग,
आज घेतली शरद पवार यांची भेट,
पार्थ पवार ला उमेदवारी द्या केली मागणी
हितेंद्र ठाकूर यांनी घेतली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट, पालघर जागा मी लढवणार तुम्ही पाठिंबा द्या, हितेंद्र ठाकूर यांनी केली काँग्रेस राष्ट्रवादीला विनंती, शिवसेना ही जागा लढवणार आहे
पाच वर्षांत भारताकडून सीमेपलीकडे 3 सर्जिकल स्ट्राईक, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांचं भुवया उंचावणार वक्तव्य, परंतु तिसऱ्या एअर स्ट्राईकविषयी माहिती देण्यास नकार
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु, अशोक चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, नसीम खान उपस्थित

#RajThackeray #LIVEमुद्द्याला मुद्द्याने उत्तर मिळणार असेल तर चालेल, पण आपल्या कुठल्या गोष्टीवर जर कुणी शिव्या घातल्या तर त्याला बाहेर काढून मारा. या भाजप वाल्यांची नाटकं खूप झाली आता. : राज ठाकरे #राजठाकरे https://abpmajha.abplive.in/live-tv

#RajThackeray #LIVE चायनीज गोष्टी बंद करा म्हणायचं, मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा चायनाकडून का बनवला? : राज ठाकरे #राजठाकरे https://abpmajha.abplive.in/live-tv
निवडणुका जिंकण्यासाठी पुढच्या एक दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला घडविला जाईल : राज ठाकरे

नाशिक : गिरनारे गावात बिबट्याचा हल्ला, शेतकरी दीपक पिंगळे जखमी, दिपक यांच्या हाताला आणि तोंडाला दुखापत
, उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल

राज ठाकरे लाईव्ह : अख्ख्या देशाशी खोटं बोलत आहेत. ह्यांना सैनिकांचा वापर करून निवडणूक जिंकायचीय,

जर आपण त्यांचे एवढे लोकं मारले असते तर त्यांनी आपल्या जवानाला कसं सोडलं?, आपले एवढे लोकं मेले असते तर आपण त्यांचा माणूस सोडला असता का?

बुलडाणा : श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर समितीच्या वतीने शहीद संजय राजपूत यांच्या कुटुंबियांना दिली दहा लाख रुपयांची मदत
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर दक्षिण मधील आमदार आणि काही कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अहमदनगर येथे आले होते. बैठक संपल्यानंतर गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे असल्यामुळे सुजय विखे भाजपमध्ये जातील अशी चर्चा जोरदार सुरू आहे. त्यातच रात्रीच गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आज पुन्हा गिरीश महाजन सोबत विखे मुंबईला रवाना झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

राज्यात युती झाली असली तरी नाराज शिवसैनिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी काम करण्याची तयारी, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दावा
महिला व बालविकास मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी कराः सचिन सावंत, महिला व बालविकास मंत्रालयात माफियाराज
,
टीएचआर  कंत्राटातील घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचा पुनरूच्चार
नाशिक : देविदास जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतात काम करत असताना बिबट्याने केला हल्ला , देविदास यांचा चेहऱ्यावर मारला पंजा
नाशिक : देविदास जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतात काम करत असताना बिबट्याने केला हल्ला , देविदास यांचा चेहऱ्यावर मारला पंजा
रायगड : माणगावनजीक गोडाऊनमध्ये
रक्तचंदनाचा साठा जप्त, पॉसको कंपनीजवळ गोडाऊनमध्ये रक्त चंदनाचा मोठा साठा जप्त,
डीआरआय आणि वन विभागाची कारवाई , कोट्यवधी रुपयांचे रक्तचंदन असल्याची प्राथमिक माहिती
मुख्यमंत्रांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मदन भोसले यांच्या भाजपात प्रवेश, मदन भोसले काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे पुत्र
,
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या आग्रहानंतर झाला प्रवेश

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी, इर्टीगा गाडीने ट्रकला मागून ठोकर दिल्याने अपघात
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी, इर्टीगा गाडीने ट्रकला मागून ठोकर दिल्याने अपघात
अंगणवाडी पोषण आहाराची कंत्राटं रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा पंकजा मुंडेंना दणका
अंगणवाडी पोषण आहाराची कंत्राटं रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा पंकजा मुंडेंना दणका
खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे अनेक आमदार मुंबईत, शरद पवार यांच्या मध्यस्तीनंतर दिलजमाई, एकदिलाने निवडणूक लढणार
खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे अनेक आमदार मुंबईत, शरद पवार यांच्या मध्यस्तीनंतर दिलजमाई, एकदिलाने निवडणूक लढणार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि प्रवीण गायकवाड यांची दिल्लीत भेट, पुण्यातून काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी मिळण्यासाठी प्रवीण गायकवाड इच्छुक, भेटीवेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मार्च महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. नदी काठच्या गावांनाही आता पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आलीय... आज पाण्यसाठी संगमनेर तालुक्यातील ग्रामस्थांनी नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं
अहमदनगर : जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचे शस्त्र परवाने निलंबित.. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आजी माजी आमदारांसह दोन माजी नगरसेवकांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यामध्ये भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख दिलीप सातपुते आणि माजी नगरसेवक सचिन जाधव यांचा समावेश आहे. अहमदनगर महापालिकेच्या केडगाव पोटनिवडणुकीत दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांनी सहा जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यावर आज जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेत सहा लोकप्रतिनिधींचे जणांचे शस्त्र परवाने रद्द केले.

मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, शरद पवारांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत झाली चर्चा, पार्थ यांना उमेदवारी द्यावी, स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं नेत्यांचं मत
मुंबई : मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड, सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल रखडल्या, काही जलद लोकल धीम्या मार्गावर वळवल्या, मस्जिद बंदर आणि करी रोडच्या दरम्यान एक्स्प्रेस आणि लोकल थांबून
नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची आधीच कल्पना : परराष्ट्र मंत्रालय
जैशने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली, तरी पाकिस्तानकडून मात्र डोळेझाक : परराष्ट्र मंत्रालय
जैशने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली, तरी पाकिस्तानकडून मात्र डोळेझाक : परराष्ट्र मंत्रालय
पाकिस्तानकडून अद्याप दहशतवाद्यांविरोधात कारवाई नाही, भारताने पाडलेल्या एफ16 विमानाबाबत पाकिस्तानची गुपचिळी : परराष्ट्र मंत्रालय
पक्षांतर्गत धुसफूस सोडवण्यासाठी शरद पवारांनी बोलावली बैठक, खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजेंसह अनेक आमदार मुंबईत, शरद पवार तोडगा काढण्याची शक्यता
पक्षांतर्गत धुसफूस सोडवण्यासाठी शरद पवारांनी बोलावली बैठक, खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजेंसह अनेक आमदार मुंबईत, शरद पवार तोडगा काढण्याची शक्यता
परभणी : नाव-गाव विचारल्याने पोलिस कर्मचाऱ्यासह होमगार्डला बेदम मारहाण, जिंतूरमध्ये रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसाला चौघांची मारहाण, पोलिस व्हॅनमधील वायरलेस सेटचीही तोडफोड
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवार 10 मार्चला जंबो ब्लॉक, सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर पाच तासांचा ब्लॉक, रुळ, सिग्नल आणि ओव्हरहेडच्या देखभालीसाठी ब्लॉक

जम्मू काश्मिर : बडगाममधील काजीपुरातून भारतीय जवानाचं अपहरण, दहशतवाद्याने घरात घुसून अपहरण केल्याचा संशय

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. विरोधकांच्या टीकेनंतर महाधिवक्ता वेणुगोपाल यांचं घूमजाव, राफेल कराराच्या कागदपत्रांची चोरी नाही तर फोटोकॉपी, पीटीआयच्या मुलाखतीत दावा

2. मध्यस्थीच करायची होती तर राम मंदिराचा मुद्दा 25 वर्षे सुरु का ठेवला?, 'सामना'मधून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सवाल तर मध्यस्थीवर संघही नाराज

3. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये, रस्त्यावर मुक्तपणे वावर करतानाचा व्हिडीओ समोर

4. मुंबईतल्या 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर रद्द, निवडणुकांच्या तोंडावर  मोठा निर्णय, स्वयंपुनर्विकास प्रकल्पालाही मंजुरी

5. अहमदनगरच्या जागेवर तोडगा न निघाल्यास निर्णय घेण्यास स्वतंत्र, सुजय विखे पाटील यांचं सूचक विधान, गिरीश महाजनांच्या भेटीने भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण

6. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा आकाश आज श्लोका मेहतासोबत विवाहबंधनात, मुंबईतल्या ग्रँड वेडिंगसाठी बड्या सेलिब्रिटीजना निमंत्रण

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.