LIVE BLOG | तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 32 धावांनी पराभव

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Mar 2019 10:09 PM
#BREAKING
राफेल कराराच्या कागदपत्रांची चोरी झालेली नाही तर त्याची फोटोकॉपी काढण्यात आली आहे, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत महाधिवक्ता के. के. वेणूगोपाल यांचा दावा
जागतिक महिला दिनाच्या दिवशीच स्त्री जातीच बेवारस अर्भक सापडलं, पांडव लेणीच्या पार्किंग समोर सापडलं अर्भक, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल
जागतिक महिला दिनाच्या दिवशीच स्त्री जातीच बेवारस अर्भक सापडलं, पांडव लेणीच्या पार्किंग समोर सापडलं अर्भक, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल
निवडणूक आयोगाच्या बैठकांना जोर, निवडणुकीची घोषणा कधी होणार याकडे देशाचं लक्ष
मुंबईतल्या विनाअनुदानित शाळेतील महिला शिक्षिकांनी आज थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्रीवर धडक मारत आंदोलन केले. एकीकडं जागतिक महिला दिन असतानाही दुसरीकडं या शिक्षिका गेल्या २६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, तरीही न्याय मिळत नसल्यानं त्यांनी मातोश्री बाहेरील रस्त्यावर ठिय्या मांडला.
राजस्थान : बिकानेरमध्ये भारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं, पीटीआयची माहिती
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज कोल्हापुरात 1111 फूट तिरंगा पदयात्रा काढली. या पदयात्रेत ११२५ युवती सहभागी झाल्या होत्या. जागतिक महिला दिनानिमित पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी ही 1111 फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
धनगर समाज प्रतिनिधी वा. ना. उत्पात यांच्या भेटीला, जे रुढ नाव आहे तेच समाजाला मान्य असल्याची भूमिका घेतल्याने उत्पात यांनी घेतलेले आक्षेप मागे, विद्यापीठाला दिलेले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नाव राहणार कायम
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सुरू,
शरद पवारांच्या घरी बैठक , बैठकीला शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील उपस्थित
, नगर, औरंगाबाद, रावेर, अमरावती, ठाणे, कल्याण या जागांबाबत होणार चर्चा
नागपुरातून नाना पटोले काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची शक्यता,
काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत राज्यातील काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित, आज दिल्लीत झाली बैठक


सुजय विखे पाटील भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला,

गिरीश महाजन यांच्या शिवनेरी या शासकीय निवासस्थानी दोघांची तासभर झाली बैठक
,
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील इच्छूक
,
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जागा सोडत नसल्याने सुजय यांची भाजपकडून चाचपणी
सुजय विखे पाटील भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला,

गिरीश महाजन यांच्या शिवनेरी या शासकीय निवासस्थानी दोघांची तासभर झाली बैठक
,
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील इच्छूक
,
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जागा सोडत नसल्याने सुजय यांची भाजपकडून चाचपणी
#BREAKING
- कर्णधार विराट कोहलीचा पुन्हा धमाका,
- वन डेत 41 वे शतक ठोकले ,
- टीम इंडियाला जिंकण्यासाठी 134 धावांची आवश्यकता
मुंबई : महिला दिनी 'मातोश्री'वर शिक्षिकांचं ठिय्या आंदोलन, मुंबई महापालिकेने आश्वासन, पूर्ण न केल्याने आणि उद्धव ठाकरे यांनी शब्द न पाळल्याने महापालिका शिक्षिकांचा ठिय्या, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा
#INDvsAUS : रांचीतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, भारतीय संघात कुठलाही बदल नाही, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांंजली म्हणून भारतीय खेळाडू लष्करांची कॅप घालून मैदानावर उतरणार
शहरी नक्षलवाद, भिमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या वर्णन गोन्साल्वेस यांना तूर्तास हायकोर्टाचा दिलासा नाही, आरोपपत्र दखल करण्यास दिलेली मुदतवाढ आणि बेकायदेशीर अटकेला विरोध करत गोन्साल्वेस यांची हायकोर्टात याचिका, राज्य सरकारला 9 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मालपूर-कासारे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने साक्रीकडे जाणाऱ्या दुचाकीला हुलकावणी दिल्यानं दुचाकी चालकाचा ताबा सुटून दुचाकीवरील दोघे खाली कोसळले. याच वेळी साक्रीकडून नामपूरकडे येणाऱ्या एसटी बसखाली हे दुचाकी स्वार सापडल्याने या दोघांचा मृत्यू झाला.


भाजपसारख्या डिजीटल फ्रेंडली पक्षाला आपली हॅक झालेली वेबसाईट रिस्टोअर करण्यासाठी तीन दिवस लागावेत, अल्ट न्यूजच्या प्रतिक सिन्हा यांचा सवाल
अयोध्या प्रकरणी मध्यस्थ नियुक्तीवर समितीची स्थापना, मध्यस्थासाठी श्री श्री रवीशंकर, निवृत्त न्यायमूर्ती खलीफुल्ला, वरिष्ठ अॅड. श्रीराम पंचू यांची त्रिसदस्यीय समिती, सुप्रीम कोर्टाची परवानगी, सुनावणी सुरु
गडचिरोली : अहेरीवरुन हैदराबादला जाणाऱ्या शिवशाही बसचा अपघात, करीमनगर-मंचेरीयलजवळ आज पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात, चालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू, बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती
नाशिक-मुंबई-आग्रा हायवेवर एसटी बसचा अपघात, चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस पलटी, प्रवास करत असलेले विद्यार्थी अपघातात जखमी
मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाउन फास्ट लोकल उशिराने, हार्बर मार्गावरील अंधेरीकडे जाणारी आणि अंधेरीकडून येणारी वाहतूक विस्कळीत

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. पुलवामा हल्ला हा नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांचं मॅच फिक्सिंग, काँग्रेस नेते हरिप्रसाद यांचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

2. लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल-सोनिया गांधी पारंपरिक मतदारसंघातूनच मैदानात, प्रियंका गांधींचं नाव नाही

3. लोकसभा लढण्यास मनसे इच्छुक नाही, शरद पवार-राज ठाकरेंची चर्चा झाल्याची माहिती, मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध कायम

4. एकाच आठवड्यात आज दुसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयांची शक्यता

5. अयोध्या प्रकरणातील मध्यस्थीबाबत आज सुप्रीम कोर्टात निकाल, हिंदू महासभेचा विरोध, तर निर्मोही आखाडा, मुस्लिम पक्षकार मध्यस्थीसाठी अनुकूल

6. जागतिक महिला दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते नारीशक्ती पुरस्काराचं वितरण, 'बीजमाता' राहीबाई पोपरेंचा होणार सन्मान, महिला दिनानिमित्त 'माझा'वरही विशेष कार्यक्रम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.