LIVE BLOG | मराठमोळ्या राही सरनोबतचा जर्मनीतल्या नेमबाजी विश्वचषकात सुवर्णवेध
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
28 May 2019 05:02 PM
पुणे : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या धनंजय कुडतरकरवर गुन्हा दाखल, पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा आणि समाजात अश्लीलता पसरवण्याचा गुन्हा नोंद
मराठमोळ्या राही सरनोबतचा जर्मनीतल्या नेमबाजी विश्वचषकात सुवर्णवेध, 25 मीटर पिस्टल क्रीडाप्रकारात सुवर्णपदक, टोकीयो ऑलिम्पिकचं तिकीटंही कन्फर्म
मुंबई : शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता, भाजपातर्फे पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज दाखल, काँग्रेस उमेदवार देण्याच्या शक्यता कमी, काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून संख्याबळ होत नसल्याने उमेदवार देण्याची शक्यता कमी, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम मुदत
बारावी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, सकाळी 11 वाजता निकाल जाहीर होणार
जालना : टिप्पर-दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी ठार, जालना-भोकरदन रोडवर गुंडेवाडी जवळील घटना, योगेश बोडखे आणि पूजा बोडखे अशी मृतांची नावे
नाशिक : मनमाडचे पाणी संपेपर्यंत नगरपालिका गप्प का राहिली? मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती का कळवली नाही? नाशिक जिल्हाधिकाऱ्यंकडून मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांच्या चौकशीचे आदेश
मुंबई : युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांची इंस्टाग्रामवर पोस्ट, युवासेनेकडून आदित्य ठाकरेंना विधानसभा लढवण्याचा आग्रह?, युवासैनिक वरूण सरदेसाईंच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण
मुंबई : अभिनेता अजय देवगण यांच्या वडीवलांचं निधन, वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांकडूव अभय योजना मंजूर, नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशाशित गावे आणि शासकीय नळ जोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करुन, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये आणि 6 महिने कालावधीमध्ये भरण्याची ‘अभय योजना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे

विधान परिषद पोटनिवडणूक : सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख अर्ज दाखल करण्यासाठी विधिमंडळात दाखल, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, नीलम गोऱ्हे, राज पुरोहित, अमित साटम, निरंजन डावखरे, भारती लव्हेकर उपस्थित
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी विधानसभेच्या तयारीला, 1 जून रोजी होणार मुंबईत बैठक, सकाळी प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर दुपारी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांशी चर्चा
सत्तेत येताच खुल्या प्रवर्गातील दहा टक्के आर्थिक आरक्षण लागू, मोदींची माहिती, गरिबांना हक्कासाठी इतकी वर्ष वाट का पाहावी लागली? वोट बँकेच्या राजकारणासाठी गरीबांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष, मोदींचा घणाघात

राजकीय द्वेषातून अनेक कार्यकर्ते शहीद : नरेंद्र मोदी
धनंजय महाडिक यांनी कोणत्याही पक्षात जावं पण पक्षांशी निष्ठेनं राहावं, शिवसेना खासदार संजय मंडलिकांचा महाडिकांना टोला
मुंबई : डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरण, तीनही निलंबित वरिष्ठ डॉक्टरांचं 'मार्ड'ला पत्र, आरोपी अंकिता खंडेलवाल, हेमा आहुजा, भक्ती मेहरे यांनी मार्डसमोर मांडली आपली बाजू, शनिवारी मार्डकडून निलंबनाची कारवाई
नवी मुंबई : महापालिका स्थायी समिती सभापतीपद निवडणूक, राष्ट्रवादीच्या नविन गवते यांची निवड, शिवसेनेच्या ज्ञानेश्वर सुतार यांचा दोन मतांनी पराभव
मुंबई : हार्बर मार्गावर गुरु तेग बहादूर नगर आणि चेंबूर स्थानकाच्या दरम्यान अचानक ब्लॉक, अत्यावश्यक कामासाठी पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दुपारी 12 वाजल्यापासून ब्लॉक, डाऊन दिशेच्या काही गाड्या रद्द, तर इतर गाड्या उशिराने, प्रवाशांना मनस्ताप
येत्या पाच वर्षात उत्तर प्रदेशचा समावेश विकसित राज्यांच्या यादीत करणार : अमित शाह
नरेंद्र मोदींच्या प्रचार रॅलीवरुनच निकालाचा अंदाज आला होता, अमित शाह यांचं वक्तव्य, 2014 पासून काशीमध्ये मोठा फरक पडल्याचंही मत
LIVE : वाराणसीला मोदी लोकप्रतिनिधी म्हणून लाभले हे भाग्यचं, भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं भाषण सुरु
LIVE : वाराणसीला मोदी लोकप्रतिनिधी म्हणून लाभले हे भाग्यचं, भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं भाषण सुरु
रॉबर्ट वाड्रांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणातील जामिनावर ईडीचं आव्हान, 17 जुलैला सुनावणी
डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल आज बंद होणार नाही, वाहतूक वळवणे आणि पर्यायी मार्गाबाबत अद्याप कुठलंही नियोजन नाही, केडीएमसी, रेल्वे आणि वाहतूक विभाग यांच्या बैठकीत होणार नियोजन, निवडणुकीच्या कामामुळे बैठक लांबणीवर, दोन दिवसात विभागवार बैठकांनंतर निर्णय
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'वर संध्याकाळी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली, केंद्रातील आणि राज्यातील घडामोडींवर होणार चर्चा, केंद्रात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? याबाबत खलबतं, राज्यात मंत्रिमंडळ विस्तारबाबतही होणार चर्चा

राधाकृष्ण विखे पाटलांसह काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, प्रवेशासाठी दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहण्याची चिन्हं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वाराणसीत आगमन, विमानतळावर भाजपाध्यक्ष अमित शाह, राज्यपाल राम नाईक, लालकृष्ण अडवाणी उपस्थित, मोदी धन्यवाद रॅलीतून मतदारांचे आभार मानणार, काशी विश्वेश्वराच्या मंदिरात करणार पूजा
नागपूर : कुख्यात गुंड कार्तिक तेवर याची मध्यरात्री पाचगावजवळ हत्या, नागपूर ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरु, संशयित ताब्यात, गँगवॉर असल्याचा पोलिसांना संशय
नागपूर : कुख्यात गुंड कार्तिक तेवर याची मध्यरात्री पाचगावजवळ हत्या, नागपूर ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरु, संशयित ताब्यात, गँगवॉर असल्याचा पोलिसांना संशय
सैन्याचं बनावट ओळखपत्र तयार करुन वावरणारा तोतया जवान नवनाथ जाधव गजाआड, सहा महिन्यांच्या चौकशीनंतर ओळखपत्र बनावट असल्याचं उघड, जवानांनी सापळा रचून केलं होतं देवळाली कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन
सांगली : काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या आमदारपदाच्या निवडणुकीसाठी सांगली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आज अर्ज भरण्याची शक्यता
सांगली : काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या आमदारपदाच्या निवडणुकीसाठी सांगली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आज अर्ज भरण्याची शक्यता
मुंबई : गोवंडी भागात सकाळी सहा वाजताच्या सुमारास गोळीबार, संपत्तीच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती, दोन तरुण जखमी
औरंगाबाद : पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बसपचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांचं निलंबन, बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांची माहिती
औरंगाबाद : पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बसपचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांचं निलंबन, बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांची माहिती
शरद पवार आज सकाळी दहा वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
पार्श्वभूमी
1. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी 30 मे रोजी संध्याकाळी सात वाजता, राष्ट्रपती भवनात सोहळा, गुजरात दौऱ्यादरम्यान मोदी आईच्या भेटीला
2. स्मृती इराणींचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाला स्वतः इराणींकडून, लोकसभेच्या निकालानंतर अमेठीत निर्घृण हत्या, कुटुंबियांचा काँग्रेस कार्यकर्त्यांवर संशय
3. नेत्यांच्या पुत्रप्रेमामुळे काँग्रेसची वाताहत, राहुल गांधींचा गहलोत, कमलनाथ आणि चिदंबरांकडे रोख, मुलांच्या तिकीटासाठी दबाव टाकल्याचा गौप्यस्फोट
4. विजयी सभेत बोलताना भाजपचे साताऱ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांची जीभ घसरली, रामराजेंच्या जन्मदात्यांवरुन खालच्या पातळीचं वक्तव्य
5. टिकटॉक व्हीडिओ तयार करण्यासाठी चक्क नागाचा किस, डोंबिवलीतल्या मुलांचा जीवघेणा खेळ, वनखात्याकडून दोघांना अटक
6. मुंबईच्या धारावीतील इमारती आकर्षक चित्रांनी रंगल्या, परदेशी कलाकारांची मनमोहक ग्राफिटी, पेटींगच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवनाचं चित्रण