LIVE BLOG | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना त्यांनी केलेल्या रंगीबेरंगी पोशाखाची मोठी चर्चा रंगली
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 26 Mar 2019 10:43 PM

पार्श्वभूमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा1. सत्तेत आल्यास गरीब कुटुंबांना वार्षिक 72 हजाराचं उत्पन्न मिळवून देऊ, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधींकडून गरिबी हटाओचा नारा, तर योजना फसवी असल्याची भाजपची...More
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा1. सत्तेत आल्यास गरीब कुटुंबांना वार्षिक 72 हजाराचं उत्पन्न मिळवून देऊ, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधींकडून गरिबी हटाओचा नारा, तर योजना फसवी असल्याची भाजपची टीका2. नागपूरमध्ये निवडणूक पथकाकडून 25 लाख जप्त, तर अमरावतीमध्ये सव्वातीन लाखांची रोकड ताब्यात, पोलिसांची कारवाई3. हिंमत असेल तर धनंजय मुंडेंनी लोकसभा लढवावी, बीडच्या प्रचारसभेत पंकजा मुंडेंचं आव्हान4. पाकिस्तानने भारताचे 40 अतिरेकी मारल्यानं देशात रोष, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं भाषणादरम्यान 'स्लिप ऑफ टंग', विरोधकांकडून क्लिप व्हायरल5. शत्रूशी दोन हात करण्यासाठी चिनुक हेलिकॉप्टर्स देशसेवेत दाखल, भारताची ताकद वाढवण्यात चिनुक गेम चेंजर ठरणार, हवाईदल प्रमुखांना विश्वास6. 'किंग्ज इलेव्हन पंजाब'कडून राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव, आयपीएलमध्ये गेलकडून चार हजार धावांचा टप्पा पार
मुंबई : चेंबूर नाका येथील गणेश नगर भागातील 15 झोपडपट्टीला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग, सिलेंडरचाही स्फोट, अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी, आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी नाही.