LIVE BLOG | आज दिवसभरात... 15 फेब्रुवारी 2019
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
28 Feb 2019 06:54 AM
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघाची निवड, संघामध्ये बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन, के.एल राहुलला संधी, मयांक मार्केंडेयचं पदार्पण
स्वाभिमान पक्षाकडून लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग साठी निलेश राणेंची उमेदवारी नारायण राणेंनी जाहीर केली, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पहिला मेळावा
अहमदनगर : पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा अण्णा हजारे यांनी केला निषेध. सरकारने आता बदला घ्यावा. माझं वय जास्त झालाय पण वेळ पडली तर सीमेवरही जाईल- अण्णा हजारे, अण्णांना बोलताना गहिवरले
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी
सोलापूरात पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढत निषेध, पार्क चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत धिंड काढली
मराठा आरक्षण सुनावणी : राज्य मागास प्रवर्ग आयोगासाठी माहिती संकलित करणाऱ्या पाचपैकी एकाही संस्थेला अशाप्रकारच्या कामाचा कोणताही पूर्व अनुभव नाही, पाच पैकी तीन संस्था या भाजपशी संबंधित असल्याचा विरोधक याचिकाकर्त्यांचा आरोप
राज्य सरकारच्या मदतीआधी सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून शहिद जवानांना मदत जाहीर, काल झालेल्या हल्ल्यानंतर राज्य सरकारकडून शहीद जवानांच्या मदतीसाठी अद्याप कुठलीही हालचाल नाही
राज्य सरकारच्या मदतीआधी सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून शहिद जवानांना मदत जाहीर, काल झालेल्या हल्ल्यानंतर राज्य सरकारकडून शहीद जवानांच्या मदतीसाठी अद्याप कुठलीही हालचाल नाही
जालना : गोंदी पोलिस स्टेशनमधील API ची गोळी झाडून आत्महत्या
जालना : गोंदी पोलिस स्टेशनमधील API ची गोळी झाडून आत्महत्या
जम्मू-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झाल्याच्या निषेधार्थ मुंबईतील बोरिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानच्या विरोधात घोषणा, सर्वसामान्य नागरिकांचाही सहभाग
जम्मू-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झाल्याच्या निषेधार्थ मुंबईतील बोरिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानच्या विरोधात घोषणा, सर्वसामान्य नागरिकांचाही सहभाग
बारामती : संपूर्ण देश पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या पाठीशी आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. पण देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अपयश समोर आलं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. या हल्ल्यामागे शेजारच्या राष्ट्राचा हात असल्याची शक्यताही पवारांनी वर्तवली आहे. तसंच हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द, मध्य प्रदेशच्या ईटारसीमधील सभाही न घेण्याचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदीचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द, मध्य प्रदेशच्या ईटारसीमधील सभाही न घेण्याचा निर्णय
UPDATE : #PulwamaTerrorAttack : सीआरपीएफच्या अधिकृत माहितीनुसार 37 जवान शहीद, पाच जवान जखमी
पुलवामा हल्ल्याचा निषेध करा, उद्धव ठाकरेंचे शिवसेना कार्यकर्त्यांना आदेश, शिवसेना महाराष्ट्रासह मुंबईतल्या विविध भागात रस्त्यावर उतरुन पाकिस्तानचा निषेध करणार
पार्श्वभूमी
1. देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, जम्मू काश्मिरमधील पुलवामात अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या बसवर धडकवली, 39 जवान शहीद, तर 20 जखमी
2. हल्ल्यामुळे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची सकाळी महत्त्वाची बैठक, तर हल्ल्याचा तपास करण्यासाठी एनआयए, एनएसजी काश्मीरला रवाना
3. पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, गृहमंत्री राजनाथ सिंहांचा दावा, शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा
4. अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात पाकविरोधी घोषणाबाजी, पाकिस्तानचा बदला घ्या, मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील नागरिकांची रस्त्यावर उतरुन मागणी
5. युतीबाबत शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती, लवकरच युतीची घोषणा होण्याची शक्यता
6. लष्करी शस्त्रास्त्रं आणि जीवनशैलीचं आजपासून प्रदर्शन, परळच्या कामगार मैदानात खास कार्यक्रम, लक्ष्य फाऊंडेशनचा उपक्रम