LIVE BLOG | आज दिवसभरात... 14 फेब्रुवारी 2019

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Feb 2019 10:52 PM
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा बारामती दौरा रद्द, मुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते.
जम्मू काश्मीरच्या शोपियात दुसरा अतिरेकी हल्ला, कीगम पोलीस ठाण्यावर अतिरेक्यांचा गोळीबार
पुलवामा दहशतवादी हल्ला, शहीद जवानांची संख्या 40 वर
या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, सरकार गप्प बसणार नाही, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर, मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा हजर, काही करून सेना भाजप युतीचा मार्ग मोकळा करा, अमित शाहांकडून महाराष्ट्र भाजपला अल्टीमेटम
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, बार्शीचा आशीष बारकुल राज्यात पहिला, ओबीसी प्रवर्गातून महेश जमदाडे महाराष्ट्रात पहिला
नागपूर : पुलवामा हल्ल्यासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य. 'आम्ही आजवर खूप सहन केलेय. आजही करतोय. आता जशाच तसे उत्तर देने आवश्यक आहे'

सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.
प्रियांका गांधींची प्रेस कॉन्फरन्स रद्द, जम्मू काश्मीरच्या हल्ल्याचा निषेध, जम्मूमध्ये वाढते हल्ले चिंतेचा विषय, सरकारने या प्रकरणी कडक पाऊल उचलावे, प्रियांका गांधींची मागणी
जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपुरा भागात लष्करी जवानांवर देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचं ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.
दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी याचा निषेध करतो, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्व भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शूर शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. जखमी झालेले जवान लवकर पूर्णपणे बरे होवोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला, या हल्ल्यात 30 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. शहीदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला, या हल्ल्यात 30 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. शहीदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दहशतवादाच्या विरोधात सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईला उत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला असल्याचं काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे सल्लागार विजय कुमार म्हणाले.
श्रीनगर-जम्मू हायवेवर सीआरपीएफच्या जवळपास 2500 जवानांना घेऊन जाणाऱ्या 70 बसच्या ताफ्यातील एका बसवर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा हल्ला, पुलवाम्याच्या काकापुऱ्यातील अदिल अहमद या जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्याने हल्ला घडवला असल्याची जम्मू-काश्मीर पोलिसांची माहिती
भारतीय जवानांवरील भ्याड हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीदेखील ट्वीट करुन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

ज्या गाडीने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला, त्यात 200 किलोपेक्षा जास्त विस्फोटक होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे. औरंगाबाद विमानतळावर उपचार घेऊन मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले, देवेंद्र फडणवीस यांच्या आज बुलढाणा आणि वाशीम दौरा होता, मात्र बुलढाणा दौऱ्यावर असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी आपला पुढील दौरा रद्द केला.

आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांनी अतिरेकी हल्ल्याची माहिती मिळताच ट्वीट करत त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवाय केंद्र सरकारला दहशतवाद्याच्या विरोधात ठोस पाऊल उचलायला पाहिजे, असही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करणार, महाआघाडीबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचं वक्तव्य, राज ठाकरेंसोबत चर्चा काढून मार्ग काढणार असल्याचीही माहिती
भारतीय जवानांवरील भ्याड हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीदेखील ट्वीट करुन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या सर्व राजकीय पक्ष मिळून यावर तोडगा काढतील.

पुलवामा येथे भारतीय जवानांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी ट्वीट करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
"भारतीय जवान आणि देशाचा नागरिक असल्याने आज पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याची माहिती मिळाल्यापासून माझं रक्त सळसळत आहे. खूप राग आला आहे. या भ्याड हल्ल्यात आपले 18 जवान शहीद झाले आहेत. मी त्या शहीद जवानांच्या शौर्याला सलाम करतो. भारतीय जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आम्ही बदला घेऊ" : माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह
युतीच्या चर्चेसाठी शिवसेनेचं भाजपला अल्टिमेटम, पुढच्या 48 तासात युतीची चर्चा अंतिम स्वरुपात आली नाही, तर शिवसेना आपल्या उमेदवारांच्या प्रचार मोहिमा सुरु करणार, सूत्रांची माहिती
मुंबई : मध्य रेल्वेवर कसाऱ्याहून कल्याणकडे जाणारी रेल्वेसेवा अर्धा तास उशिराने,
दुरांतो एक्स्प्रेस, एक मालगाडी आणि कसारा-सीएसएमटी लोकल संथ गतीने, कल्याण स्टेशनवर प्लॅटफॉर्म रिकामा नसल्याने रेल्वेसेवेला फटका
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रकाश आंबेडकरांना चार जागा सोडण्याची तयारी, मात्र 12 जागांच्या मागणीवर आंबेडकर ठाम, स्वतंत्र निवडणूक लढवून प्रकाश आंबेडकरांना भाजपला मदत करायची असल्याची काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना शंका

जम्मू-काश्मीरच्या अवंतीपूरा येथे अडीच हजार जवानांचा ताफा जात असताना अतिरेक्यांचा हल्ला, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 18 जवान शहीद
रासपतर्फे 24 फेब्रुवारीला धनगर आरक्षण अंमलबजावणी मेळावा, मुंबईत शिवाजी पार्कवर होणार, मेळाव्यात मुख्यमंत्री उपस्थित राहणार
नवी दिल्ली : नारायणा भागातील परफ्यूम फॅक्टरीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी
नवी दिल्ली : नारायणा भागातील परफ्यूम फॅक्टरीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी
औरंगाबाद : बजाजनगरमध्ये लघुउद्योजकाची आत्महत्या, संजय विनायक पाटील यांचा राहत्या घरी गळफास, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
पिंपरी-चिंचवड मधील शिवसेना नगरसेवक आणि महापालिका गटनेते राहुल कलाटेंवर गुन्हा दाखल, पालिका अधिकारी अनिल राऊत यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप

पार्श्वभूमी

1. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय बैठकांचं सत्र, शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीचं आयोजन तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना बोलावणं

2. राज ठाकरे-अजित पवारांमध्ये गुप्त बैठक, मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत राष्ट्रवादी सकारात्मक, मात्र निर्णयाचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात

3. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, लोकसभेत मुलायम सिंह यादवांच्या वक्तव्यामुळे महागठबंधनमधील पक्षांना घाम फुटला, मोदींकडूनही मुलायम यांचे आभार

4. 16 व्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात मोदींकडून विरोधकांचा समाचार, राहुल गांधींच्या भूकंपाच्या वक्तव्याची खिल्ली, तर गळाभेट आणि डोळ्यांच्या इशाऱ्यांना टोला

5. मुंबईसह पुणे, नाशिक आणि औरंगाबादेत म्हाडाची लवकरच लॉटरी, पुण्यात 4 हजार तर नाशिकमध्ये 1 हजार घरं

6. 'चला हवा येऊ द्या'मध्ये अलिबागची अवहेलना झाल्याच्या गैरसमजातून अलिबागकरांचा संताप, मात्र आलेपाक शब्द वापरल्याच्या स्पष्टीकरणानंतर वाद निवळला

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.