LIVE UPDATE | आज दिवसभरात... 11 फेब्रुवारी 2019
आजच्या दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 11 Feb 2019 10:23 PM

पार्श्वभूमी
1. अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण रोखल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु, बदलांवर बोलणं औचित्यभंग कसा, पालेकरांचा सवाल, तर हेच का अच्छे दिन, काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांची टीका2. फेसबुक, व्हॉट्सअपनंतर आता ट्विटरलाही मोदी...More
1. अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण रोखल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु, बदलांवर बोलणं औचित्यभंग कसा, पालेकरांचा सवाल, तर हेच का अच्छे दिन, काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांची टीका2. फेसबुक, व्हॉट्सअपनंतर आता ट्विटरलाही मोदी सरकारची तंबी, ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश, समाजमाध्यमांवर कडक प्रतिबंध लावण्याचे प्रयत्न3. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या चार दिवसीय दौऱ्यावर, लखनौमध्ये काँग्रेसकडून पोस्टरबाजी आणि शक्तीप्रदर्शन4. सोलापुरात पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, हल्ल्यात पोलिस निरीक्षक जखमी, गोळीबारात विनायक काळेचा मृत्यू, तर चकमक बनावट असल्याचा कुटुंबीयांचा आरोप5. भिवंडीत 2005 साली झालेल्या दंगलीतील एका आरोपीला 12 वर्षांनंतर अटक, निजामपुरा पोलिसांना मोठं यश6. मुंबईतल्या रस्त्यांवर धावल्या 400 विंटेज कार, वांद्रे ते बेलार्ड पिअरपर्यंत 1885 सालापासूनच्या विंटेज कार्सची रॅली
खासदार राजू शेट्टी महाआघाडीत जाणार नाही, जागावाटपावर तोडगा न निघाल्याने भूमिका, स्वाभिमानी शेतकरी संघटना नऊ जागा लढवण्याच्या तयारीत