LIVE BLOG | लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 10 Mar 2019 10:14 PM

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. लोकसभा निवडणुकांपूर्वी मनसे-राष्ट्रवादीची एकत्र सभा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राज ठाकरेंची तोफ राष्ट्रवादीच्या मंचावरुन धडाडण्याची शक्यता2. निवडणुकांच्या तोंडावर पुलवामासारखा हल्ला...More

IND vs AUS 4th ODI: चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर चार विकेट्सने मात, मालिकेत ऑस्ट्रेलिया-भारताची 2-2 ने बरोबरी
भाजपाच्या निवडणूक समनवय समितीची उद्या (11 मार्च) मुंबईत बैठक, जिल्हाध्यक्ष-पदाधिकाऱ्यांना देणार प्रचाराचे नवे फंडे,
या बैठकीला भाजपाच्या 25 लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष आणि महत्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असून यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काय रणनीती आखायची, आचारसंहितेचे पालन करून कसा प्रचार करायचा याची माहिती देण्यात येणार आहे.