LIVE BLOG | नाणार प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Mar 2019 10:31 PM




नाणार प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, अधिग्रहीत जमिनी परत करणार, जिथे स्वागत होईल तिथे प्रकल्प उभारला जाणार, उद्योग मंत्री सुभाष देसाईंची माहिती
आदिवासी समाजाला लागू असलेल्या योजना धनगर समाजाला लागू करणार, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांप्रमाणे स्कॉलरशिप मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची भेट घेतली





अंबरनाथच्या शिवमंदिरात गाभाऱ्यात प्रवेशबंदी,

महाशिवरात्रीला बाहेरूनच घ्यावं लागणार दर्शन,

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस आणि मंदिराचा निर्णय
मनमाड : भाजप-सेना युती सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव जाहीर करावा या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने लासलगावच्या विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन केले, कांद्यासह अन्य पिकाला हमी भाव मिळावा,सर्वशेतक-यांना सरसकट शंभर टक्के कर्जमाफी करावी,द्राक्षाचा पीक विम्यात समावेश करावा,विजेचे लोडशेडिंग बंद करुन दिवसा वीज पुरवठा करावा,स्वामीनाथन आयोग लागू करावा,दुष्काळी परिस्थिती मुळे शेतक-यांची विज बिल माफ करावी अशा विविध मागण्यांसाठी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर येथिल तीन पाटीवर राष्टवादी कॉंग्रेस तर्फे  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलची दिमाखदार सुरुवात,

अंबरनाथकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलेची मेजवानी

, निलाद्री कुमारांच्या सादरीकरणानं श्रोते मंत्रमुग्ध
मंगळवेढ्यात संतोष माने हे दोन तीन दिवसांपासून कॉंग्रेस आमदार भारत भालके यांच्या विरोधात उपोषणाला बसले होते .. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानं आज हा उपोषणकर्त्याने गाडीला स्पिकर लावून आमदार कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या उपोषणकर्त्याला भर चौकात कपडे फाटेपर्यंत मारहाण केली .
मुंबई :

राज्यातील शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना होणार
,

कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या नावाने सुरू होणार शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यासाठी प्रयत्न, याचा एक भाग म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहिलं
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यासाठी प्रयत्न, याचा एक भाग म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहिलं
पाकिस्तानी पायलटला भारतीय समजून पाक जनतेने ठार मारलं,नंतर ओळख पटली, मात्र तोवर त्याचे निधन,
फर्स्ट पोस्टचा दावा, पायलट शाहजुद्दीनला लोकांनी मारलं
हैदराबाद : भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे,
- ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारताचा वीरपुत्र जरी मायदेशी परतला असला तरी, पाकिस्तानचा भारताविरोधात डाव सुरुच आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आणि आयएसआय भारतीय सैनिकांच्या जेवणात विष मिसळण्याच्या प्रयत्नात असल्याची कुणकुण आपल्या गुप्तचर यंत्रणांना लागलीय.त्यामुळे भारताच्या लष्कराच्या रेशनिंग गोदाम सुरक्षेला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेविरोधातील याचिका इस्लामाबाद हायकोर्टानं फेटाळली,


इम्रान खान यांचा निर्णय परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तानच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्यच - इस्लामाबाद हायकोर्ट
वर्धा :
अवैध दारूचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी एक हजार रुपयांची लाचेच्या मागणी
,

वर्धेच्या रामनगर पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल.
भिवंडी : भिवंडीत बॅडमिंटन खेळणाऱ्या मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू , शहरातील निजामपूर भागातील कुरेशीनगरमध्ये अरबी मदरसेजवळील मोकळ्या जागेत काल बॅडमिंटन खेळणाऱ्या मुलाचं शटल (फूल ) पत्र्यामध्ये अडकल्याने तो काढण्यासाठी गेला असता लोखंडी एंगलमधून वीजेचा शॉक लागल्याने मुलाचा जागीच मृत्यू .

पार्श्वभूमी

1. अवघ्या 3 दिवसात शत्रुच्या तावडीतून देशाचा वाघ मायदेशी, देशभर दिवाळीसाखरी आतषबाजी, दिल्लीत आज मेडीकल तपासणी

2. मायदेशी पाय ठेवल्याचा आनंद शब्दात न सांगण्यासारखा, परतल्यानंतर अभिनंदन यांची पहिली प्रतिक्रिया, तर सोशल मीडियातून स्वागताचा पाऊस

3. जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामधल्या चकमकीत 5 जवान शहीद, 2 सीआरपीएफ आणि 2 स्थानिक पोलिसांना वीरमरण, एका स्थानिकाचाही मृत्यू

4. मोदींना मीडियासमोर बसवा, देश सोडून पळण्याची वेळ येईल, धुळे आणि मुंबईत राहुल गांधींची मोदींवर सडकून टीका, चौकीदार चोर है चा पुनरुच्चार

5. अहमदनगर लोकसभेचा संभ्रम कायम,  नगरबाबत अद्याप निर्णय नाही, जयंत पाटील यांचे ट्वीट

6. धनगर आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, आज पहिली बैठक

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.