Year Ender 2023 : 2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. दरवर्षी डिसेंबर (Year Ender 2023) महिन्यात गुगल सर्वात जास्त सर्च केलेल्या सर्व गोष्टींची यादी जाहीर करते. या यादीमध्ये 5 ठिकाणांची नावे आहेत, ज्यांना सर्वात जास्त सर्च करण्यात आले आहे. या पाच ठिकाणी भारतातील गोव्याचाही समावेश आहे. जगातील सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या टॉप 5 ठिकाणांमध्ये (Most Searched Travel Destinations 2023 in the World) गोव्याचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जाणून घ्या या वर्षी जगभरात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या 5 ठिकाणांबद्दल...


व्हिएतनाम 


या यादीत व्हिएतनाम पहिल्या क्रमांकावर आहे. व्हिएतनाम आपल्या स्ट्रीट फूड, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या देशात तुम्ही व्हिएतनाममध्ये केवळ काही हजार रुपयांत लक्झरी कार घेऊन फिरू शकता. व्हिएतनामला भेट देण्यासाठी कोणत्याही विशिष्ट ऋतूची वाट पाहण्याची गरज नाही. आपण कोणत्याही ऋतूत फिरायला येऊ शकता, परंतु बहुतेक पर्यटक डिसेंबर ते जानेवारी दरम्यान येथे येतात.


गोवा


गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोवा आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय गोव्याची नाईटलाईफ, इथली चर्चही अतिशय सुंदर आहेत. गोव्यातही वर्षभर पर्यटक येत असतात, पण नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान गोवा फिरण्यासाठी खूप चांगला मानला जातो. ख्रिसमसपासून नववर्षापर्यंत एवढी गर्दी होते की पाय ठेवायलाही जागा नसते. दरम्यान, गोव्यातील हॉटेल्स वगैरेही खूप महाग होतात. पण तरीही जगभरातून लोक या निमित्ताने गोव्यात पोहोचतात.


बाली


बाली इंडोनेशियातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हनीमून ट्रिप असो किंवा बिझनेस ट्रिप, प्रत्येकाला बालीच्या लक्झरी लाईफचा आनंद घ्यायचा असतो. बालीला प्राचीन मंदिरांसाठी 'हजार मंदिरांचे बेट' असेही म्हटले जाते. निळ्या समुद्राच्या काठावर वसलेले उलुवातू मंदिर पर्यटकांना आकर्षित करते. माउंट बतूर आणि माउंट आगुंग हे या सुंदर बेटावर दोन सक्रिय ज्वालामुखी आहेत, जे इथले सर्वात मोठे आकर्षण आहे. याशिवाय पक्ष्यांच्या 280 प्रजाती, जगातील सर्वात महागडी कॉफी कोपी लुवाक, तसेच स्कूबा डायव्हिंगचा आनंद येथे घेता येतो.


थायलंड



थायलंड आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखला जातो. थायलंडच्या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य जगभरातील पर्यटकांना ही आकर्षित करते. भारताजवळ असल्याने आणि स्वस्त असल्याने येथील लोकांना विशेषतः थायलंडला जाणे आवडते. येथे अनेक सुंदर बुद्धमंदिरे आहेत. याशिवाय नाईटलाईफ, मसालेदार पदार्थ, सीफूडची आवड असणारे लोकही दरवर्षी येथे येतात.


श्रीलंका



श्रीलंका हे एक अतिशय सुंदर बेट राष्ट्र आहे जे आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राने वेढलेले श्रीलंका हे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. चेन्नईहून अवघ्या 55 मिनिटांत श्रीलंकेला पोहोचता येते. पावसाळ्यात इथलं सौंदर्य अनेक पटींनी वाढतं.


इतर महत्वाची बातमी-


Year Ender 2023 : 2023 मध्ये भारतीय देवा चरणी लीन; 'या' मंदिरात केली चिक्कार गर्दी, तुम्ही 'या' मंदिरात गेलाय का?