Year Ender 2023 : 2023 वर्ष (Year Ender 2023) संपून 2024 (New Year 2024) हे नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवसच राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. यावर्षी गुगलवर सर्वात जास्त हेल्दी पदार्थांना सर्च करण्यात आलं आहे. यावरून असंं दिसून येते की, लोकांना चविष्ट आणि हेल्दी दोन्ही पदार्थ खायला आवडतात. भारताची निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल सुरु आहे असं या सर्चवरून कळतंय. गुगलने 2023 मध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे. यावरून लोकांनी चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी घेतल्याचे स्पष्ट होते. या वर्षी कोणते पदार्थ सर्वाधिक लोकप्रिय होते हे जाणून घेऊयात.
बाजरी (Pearl Millet)
2023 मध्ये लोकांनी बाजरीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गुगलवर बाजरीचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. बाजरीमध्ये बार्ली, बाजरी, कोदरा, नाचणी आणि कुटकी यांसारखी धान्ये असतात. हे सर्व अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर धान्य आहेत. लोकांनी बाजरीपासून बनवलेल्या अनेक पाककृती देखील शोधल्या आहेत. बाजरी केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या आहारात बाजरीचा समावेश केला आहे.
एवोकॅडो (Avocado)
Avocado हा गुगलवर दुसरा सर्वाधिक शोधलं जाणारं फळ आहे. एवोकॅडो अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. एवोकॅडोमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी फॅट असते. यामध्ये फायबर आणि पोटॅशियम देखील मुबलक प्रमाणात आढळते. या सर्व गुणांमुळे लोकांनी एवोकॅडोला गुगलवर सर्वाधिक सर्च केले आहे.
मटण रोगन जोश
गुगलवर शोधलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मटण रोगन जोश तिसऱ्या क्रमांकावर आहे. मटण रोगन जोश हा एक प्रसिद्ध काश्मिरी पदार्थ आहे. यामध्ये मटण मसालेदार ग्रेव्हीबरोबर शिजवले जाते. हा पदार्थ तुम्ही भात किंवा नान बरोबर देखील सहज खाऊ शकता. हा एक अतिशय चविष्ट पदार्थ आहे. म्हणूनच 2023 मध्ये गुगलवर तो खूप वेळा शोधला गेला. कारण हा पदार्थ खूप फायदेशीर आणि चवदार आहे.
काठी रोल्स (Kathi Rolls)
काठी रोल या वर्षी गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या खाद्यपदार्थांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. यावरून असे दिसून येते की, लोकांना हा नाश्ता खूप आवडतो. काठी रोल हा एक प्रकारचा रोल आहे. ज्यामध्ये भाज्या, चिकन किंवा चीज इत्यादींचे पिसेस पिठापासून बनवलेल्या पातळ ब्रेडमध्ये टाकले जातात आणि त्याचा रोल केला जातो. वर चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह केले जाते. हा अतिशय चविष्ट नाश्ता आहे. लोकांना ते बनवण्याची कृती आणि हे रोल्स कुठे मिळतात हे जाणून घेण्यात फार उत्सुकता होती.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.