मुंबई: भारतात इंटरनेट कनेक्टेड गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी व्हाटसअॅपने गुंतवणुकीची घोषणा केली आहे. व्हाटसअॅपची को-फाउंडर कंपनी ब्रायन एक्टोनने भारतातील स्टार्टअप ट्रॅक अॅन्ड टेलसोबत गुंतवणुकीचे करार केले आहेत.
ट्रॅक अॅन्ड टेल ही कार ट्रेकिंग टेलेमेटिक्सवरील सेवा पुरवणारी हरयाणातील एक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली. ही ऑटोमोटिव्स टेलेमेटिक्स टेक्नॉलॉजी कंपनी बिट्स अॅन्ड बाइट सॉफ्टचीच कंपनी आहे.
ट्रॅक अॅन्ड टेलचे सीईओ प्रांसु गुप्ताने दिलेल्या माहितीनुसार, ''भारतातील कनेक्टेड कारच्या मागणीवरून आम्ही आनंदी आहोत. ही गुंतवणूक मेक इन इंडियाच्या संकल्पनेला बळ देणारी ठरणार आहे.''
"आम्ही कार आणि बाइकच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध उपाय उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात सातत्याने असतो. युरोप आणि उत्तर अमेरिकेप्रमाणेच देशभरात कनेक्टेड गाड्या अधिक संख्येने पुरवण्याचे आमचं लक्ष्य आहे.''
ट्रॅक अॅन्ड टेलमध्ये गुंतवण्यात आलेल्या पैशांचा वापर उत्पादन विकास आणि व्यापार वाढसाठी वापरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एक्टनने सांगितले की, ''प्रांसु यांच्याकडे भारतीय मोटर उद्योगासाठी अनेक उत्तम योजना आहेत. त्यामुळे मी एका गुंतवणुकदाराच्या भूमिकेतून त्याचा व्यापार वाढीला मदत करण्यासाठी उत्साही आहे. ट्रॅक अॅन्ड टेलसोबत काम करणे माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.''
आयएचएस ऑटोमोटीवनुसार, अमेरिकेत 2017पर्यंत इंटरनेट कनेक्टेड गाड्यांची संख्या एकूण गाड्यांच्या तुलनेत 60% असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या जगभरात 2.3 कोटी इंटरनेट कनेक्टेड गाड्या भारतीय रस्त्यांवर धावत आहेत. 2020मध्ये ही संख्या वाढून 15.2 कोटी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.