मुंबई : तुमच्यापैकी अनेकांना जीन्स वापरण्याची सवय असेल. कधी स्ट्रेट फीट, कधी पेन्सिल बॉटम अशा वेगवेगळ्या स्टाईलच्या जीन्स तुम्ही घालत असाल. मात्र या जीन्सचं नीट निरीक्षण तुम्ही कधी केलं आहे का? जीन्सच्या पॉकेटवर डोकवणाऱ्या छोट्या बटणांकडे कधी तुमचं लक्ष गेलं आहे का?


पॉकेटवर असलेल्या छोट्या बटणांचा उपयोग तुम्हाला माहित आहे का?

ही बटणं फक्त स्टाईलसाठी असतात, असा अनेकांचा अंदाज असतो. मात्र त्यामागेही काही कारणं आहेत. सुरुवातीच्या काळात डेनिम्स किंवा जीन्स ही कामगार वर्गाची मक्तेदारी मानली जात असे. श्रमाची काम करणाऱ्या कामगारांच्या जीन्सचे खिसे फाटणं ही नेहमीची समस्या होती.

खिशांची आवश्यकता असल्यामुळे काम करताना ते फाटणं, कामगारांना परवडणारं नव्हतं, त्याच्याकडे डोळेझाक करुन चालणार नव्हतं. 1873 मध्ये ही समस्या ऐकून जेकब डेव्हिस नावाच्या एका टेलरला कल्पना सुचली.



जेकब त्या काळी Levi Strauss & Co. अर्थात आज लिव्हाईस नावाने प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या जीन्स वापरत असे. फाटणाऱ्या खिशांवर उपाय म्हणून त्याने पॉकेट्सच्या कोपऱ्यात धातूची बटणं लावली. यामुळे खिसे जीन्सला घट्ट चिकटून राहत असत आणि फाटत नसत.

जेकबला त्याच्या कल्पनेचं पेटंट काढायचं होतं, मात्र पैशांच्या अभावी त्याला अडचण आल्या. 1872 मध्ये त्याने Levi Strauss ला पत्र लिहून आयडिया विकण्याचा प्रस्ताव ठेवला, अट एकच- कंपनीने पेटंटसाठी पैसे पुरवावेत. तेव्हापासून ही धातूची छोटेखानी बटणं तुमच्या-आमच्या जीन्सचा अविभाज्य भाग झाले.

जीन्सच्या आतील चोरखिशाचा खरा हेतू माहितेय का?