Weight Loss Tips : आजकाल वजन कमी (Weight Loss Tips) करण्याचा ट्रेंड प्रत्येकजण फॉलो करताना दिसतोय. वजन कमी करण्याच्या नादात वेट लॉसचे अनेक ट्रेंड सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतायत. यासाठी अनेकजण जिम, योगा, डाएटच्या मदतीने वजन कमी करतात तर काही ट्रेनरच्या किंवा डाएटिशियन, न्यूट्रिशनिस्टच्या संपर्कात येऊन वजन कमी करण्याचा ध्यास करतात. या सगळ्या प्रयत्नाने वजन तर कमी होतंच पण याचे फायदे तितकेच तोटे देखील आहेत.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रेंडच्या नादात लोक झटपट वजन तर कमी करतात पण यामुळे मेंटल प्रेशरचं प्रमाण फार वाढलं आहे. यामुळे त्यांना फायद्याऐवजी नुकसानच सहन करावं लागतं. सध्या असाच एक ट्रेंड फॉलो केला जातोय ज्याला लोकांची सर्वाधिक पसंती मिळतेय. हा ट्रेंड म्हणजे 90-30 आणि 50 डाएट प्लॅन.  


या डाएट प्लॅनमध्ये काब्स आणि फॅटवर जास्त प्रमाणात भर दिला जातो. खरंतर, काब्स, प्रोटीनच्या माध्यमातून फायबर इंटेकचं प्रमाण वाढवलं जातं. यामुळे आपली पचनशक्ती आणि मेटाबॉलिज्म सुधारते. पण, हा  90-30 आणि 50 डाएट प्लॅन नेमका आहे तरी काय? आणि याचे फायदे नेमके काय आहेत? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


90-30 आणि 50 डाएट प्लॅन कसा आहे?


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 90-30 आणि 50 डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला 90 टक्के पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेल्या पदार्थांचा समावेश होतो. तर, 30 टक्के कॅलरी आणि हेल्दी फॅट्स समाविष्ट असतात आणि 50 टक्के कार्बोहायड्रेट्सच प्रमाण असतं. 


90-30 आणि 50 डाएट प्लॅन कशा प्रकारे काम करतो? 


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 90-30 आणि 50 डाएट प्लॅन फॉलो केल्याने चांगल्या सवयी फॉलो केल्या जातात. यामुळे आपले आरोग्य आणि फिटनेस दोघांना फायदे मिळतात. खरंतर, लीन प्रोटीनने मांसपेशीचा चांगला विकास होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. या प्रकारच्या डाएट प्लॅनने आपले मेटाबॉलिज्म सुधारते. तसेच, रोजप्रतिकारकशक्ती देखील चांगली राहून वजन कमी करण्यासाठी फायदा मिळतो. 


'अशा' प्रकारे फॉलो करा 


90-30-50 डाएट प्लॅन तुम्हाला मिक्स फ्रूट्स आणि पालेभाज्यांचं सेवन करण्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत तर तुम्ही संत्र्याचं सेवन करू शकता. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेसाठी आणि फायबर पचनशक्ती सुधारण्यासाठी फार उपयुक्त आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Tips : गरोदरपणात महिलांना अन्न पाहताच उलटी का होते? अन्नाचा वासही का सहन होत नाही? 'हे' आहे यामागचं कारण