State wise Data on Per Capita Income:  देशातील दरडोई उत्पन्नाची राज्यनिहाय यादी केंद्र सरकारने जारी केली आहे. राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश (UT) प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार दरडोई उत्पन्नाची ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत तेलंगणा राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. वर्ष 2022-23 मध्ये तेलंगणातील व्यक्तीचे दरडोई उत्पन्न हे 3,08,732 रुपये इतके आहे. तर, दुसऱ्या स्थानी कर्नाटक आहे. कर्नाटकमधील व्यक्तींचे दरडोई उत्पन्न 3,01,673 रुपये इतके आहे. 

वर्ष 2022-23 या वर्षात महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न 2,42,247 हजार इतके असल्याची माहिती समोर आली आहे. मागील आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 2,15,233 इतके दरडोई उत्पन्न होते. तामिळूनाडूचे दरडोई उत्पन्न 2,73,288 रुपये इतके आहे. वर्ष 2021-22 मध्ये 2,41,131 रुपये इतके दरडोई उत्पन्न नोंदवण्यात आले होते. 

17 राज्यांनी वर्ष 2022-23 मधील केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडे सोपवली नााही. त्यामुळे त्या राज्यांचे दरडोई उत्पन्न स्पष्ट झाले नाही. ज्या राज्यांनी माहिती सादर केली आहे. त्या राज्यांचे दरडोई उत्पन्न मागील दोन वर्षांच्या तुलनेत वाढले आहे.

 

कोणत्या राज्याचे किती दरडोई उत्पन्न

 

 राज्याचे नाव

2020-21

2021-22

2022-23

1

आंध्र प्रदेश

1,63,746

1,92,587

2,19,518

2

अरुणाचल प्रदेश

1,90,212

2,15,897

माहिती उपलब्ध नाही

3

आसाम

90,482

1,02,965

1,18,504

4

बिहार

43,605

49,470

माहिती उपलब्ध नाही

5

छत्तीसगड

1,04,788

1,20,704

1,33,898

6

गोवा

4,31,351

4,72,070

माहिती उपलब्ध नाही

7

गुजरात 

2,12,821

2,50,100

माहिती उपलब्ध नाही

8

हरयाणा

2,29,065

2,64,835

2,96,685

9

हिमाचल प्रदेश

1,83,333

2,01,854

माहिती उपलब्ध नाही

10

झारखंड

71,071

78,660

माहिती उपलब्ध नाही

11

कर्नाटक

2,21,310

2,65,623

3,01,673

12

केरळ

1,94,322

2,28,767

माहिती उपलब्ध नाही

13

मध्य प्रदेश

1,03,654

1,21,594

1,40,583

14

महाराष्ट्र

1,83,704

2,15,233

2,42,247

15

मणिपूर

79,797

84,345

माहिती उपलब्ध नाही

16

मेघालय

84,638

90,638

98,572

17

मिझोराम

1,87,838

1,88,839

माहिती उपलब्ध नाही

18

नागालँड

1,26,452

1,42,363

माहिती उपलब्ध नाही

19

ओदिशा

1,02,166

1,28,873

1,50,676

20

पंजाब

1,49,193

1,61,888

1,73,873

21

राजस्थान

1,15,122

1,35,962

1,56,149

22

सिक्कीम

4,12,754

4,72,543

माहिती उपलब्ध नाही

23

तामिळनाडू 

2,12,174

2,41,131

2,73,288

24

तेलंगणा

2,25,687

2,65,942

3,08,732

25

त्रिपुरा

1,19,789

1,40,803

माहिती उपलब्ध नाही

26

उत्तर प्रदेश

61,374

70,792

माहिती उपलब्ध नाही

27

उत्तराखंड

1,84,002

2,11,657

2,33,565

28

पश्चिम बंगाल

1,06,510

1,24,798

1,41,373

29

अंदमानआणि निकोबार बेटे

1,97,275

माहिती उपलब्ध नाही

माहिती उपलब्ध नाही

30

चंदिगड

2,91,194

3,49,373

माहिती उपलब्ध नाही

31

दिल्ली

3,31,112

3,89,529

माहिती उपलब्ध नाही

32

जम्मू आणि काश्मीर

1,02,803

1,16,619

1,32,806

33

पाँडिचेरी

2,03,178

2,09,890

माहिती उपलब्ध नाही