Marriage Rituals : भारतात सध्या सगळीकडे लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्नसराई म्हटलं की लग्न, विधी, परंपरा या गोष्टी अगदी सहज येतात. भारतात वेगवेगळ्या प्रथांमध्ये लग्नाच्या विधी केल्या जातात. यामध्ये काही विधी अशा आहेत ज्या वर्षानुवर्ष अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या आहेत. यामागे काही धार्मिक कारणं आहेत तर काही ट्रेंडिंगनुसार पद्धती फॉलो केल्या जातात. एकूणच लग्नातील प्रत्येक विधीचा नातेवाईक, मित्रमंडळी आनंद घेतात. 


'अशी' असते बूटं चोरण्याची पद्धत   


लग्नाच्या अनेक विधींमध्ये एका विधीची मात्र वधूच्या मेव्हणी आणि इतर नातेवाईक मंडळी आवर्जून वाट पाहतात ते म्हणजे बूटं चोरण्याची पद्धत. लग्नात वधूच्या बहिणीकडे हा विशेष अधिकार दिला जातो आणि वेगवेगळ्या शक्कल लावून वराचे बूट अखेर चोरले जातात. सर्व विधीअंती वराकडून बूट परत  घेण्याचे पैसे मागितले जातात आणि वर स्वखुशीने मागितलेली रक्कम देतोसुद्धा. अशा प्रकारे ही विधी अधिक रंगत जाते आणि आजूबाजूचं वातावरणाची मजा वाढवते. पण तुम्हाला माहीत आहे का लग्नात वराची बूटं का चोरली जातात? यामागे कोणतं धार्मिक कारण आहे? याच संदर्भात आज जाणून घेऊयात.


लग्नात बूटं का चोरतात?


लग्नात चपला चोरण्याच्या या विधीमागे अनेक कारणे दिली जातात. असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीचे बूट चोरल्याने त्या व्यक्तीबद्दल अनेक रहस्ये उघड करू शकतात. अशावेळी बूट चोरण्याच्या या विधीबरोबरच वधूची बहीण किंवा मैत्रिणीही आपल्या भावोजींची पर्सनॅलिटी टेस्ट करतात. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की बूट चोरण्याच्या या विधी दरम्यान, दोन कुटुंबांमध्ये संभाषण होते, ज्यामुळे नातं अधिक घट्ट होतं. एकंदरीतच लग्नातील भावनिक वातावरण दूर करून आनंद, गंमती जमतीचा हा विधी असतो.  


खरंतर, चित्रपटातील अनेक गोष्टींचं समाज अनुकरण करत असतो. लग्नात वधूची बूटं चोरण्याच्या विधीच्या मागे कितीही मान्यता असल्या तरी प्रसिद्ध चित्रपट 'हम आपके है कौन' या चित्रपटापासून बूटं चोरण्याचा हा ट्रेंड अधिक वाढत गेला. आज प्रत्येक लग्नात हा विधी अगदी आवर्जून फॉलो केला जातो. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Swapna Shashtra : तुम्ही स्वप्नात स्वतःचे लग्न पाहिले आहे का? याचा अर्थ काहीतरी खास, स्वप्नशास्त्रात म्हटलंय...