मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात घामाने आपण सगळेच जण अत्यंत बेजार झालेलो असतो. अशातच महिलांना घामट झालेल्या लांबसडक केसांची काळजी कशी घ्यावी, हा प्रश्न पडलेला असतो. मात्र उन्हाळ्यातही केसांचं सौंदर्य कायम राखण्यासाठी या काही ब्यूटी टीप्स :

 
1. वाढत्या तापमानात केसांना तेलाऐवजी हेअर सिरम लावावं. हे कमी तेलकट असल्यामुळे केस कोमेजत नाहीत.

2. घरातून बाहेर पडताना केस स्कार्फ, टोपी किंवा स्टोलने झाकून घ्यावे

3. केस रंगवताना अमोनिया फ्री हेयर कलरचा वापर करावा. त्यामुळे केसांना पोषण मिळून उन्हाच्या दुष्परिणामांपासूनही बचाव होतो.

4. उन्हाळ्यात हवामानानुरुप हेअर स्टाईलच करावी. केसांची वेणी घालावी किंवा हलके वर बांधावेत.

5. केस घट्ट बांधणं टाळावं. यामुळे केस खराब होऊ शकतात आणि केसगळतीची शक्यताही वाढते.