Benefits Of Drinking Warm Water : बरेच लोक चहा किंवा कॉफीने तर काही लोक कोमट पाण्याने (Hot Water) दिवसाची सुरुवात करतात. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. असे काही लोक आहेत जे सकाळी गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याला महत्त्व देतात. आपल्या घरातील ज्येष्ठ सदस्य वर्षानुवर्ष सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी सेवन करत आले आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊयात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट पाणी का प्यावे? यातून शरीराला कोणते फायदे मिळू शकतात?


सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? 


1. पचन आणि चयापचय सुधारते : ​​दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने चयापचय गतिमान होते आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.


2. डिटॉक्सिफिकेशन : गरम पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. म्हणजेच, जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायले तर तुमचे शरीर आपोआप डिटॉक्स होईल. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करेल. गरम पाण्याने शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे घाम येण्या सुरुवात होते. तसेच, शरीरात साचलेली घाण घामानेच बाहेर पडते.   


3. वजन कमी करण्यास मदत होते : जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे. यामुळे भूक नियंत्रित करता येते. तसेच, तुम्हाला जास्त प्रमाणात न खाण्याची भावना विकसित होते. गरम पाणी चयापचय गतिमान करते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करते. 


4. हायड्रेशन : सकाळी लवकर कोमट पाणी प्यायल्यानेही शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. हायड्रेटेड राहिल्याने शरीराला विविध कार्य करणे सोपे जाते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. गरम पाण्याने शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे घाम येण्यास सुरुवात होते. शरीरात साचलेली घाण घामानेच बाहेर पडते.   


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?