Viral: विमानातून प्रवास करणे हे अनेक सर्वसामान्य कुटुंबाचे स्वप्न असते. आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास घडावा असं प्रत्येकाला वाटतं. आजकाल विविध कंपन्या विमान प्रवासाकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देत आहेत. तसं पाहायला गेलं तर आपण अनेक लांबच्या फ्लाइट्सबद्दल ऐकले आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही तास किंवा दिवस प्रवास करावा लागेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असा विमान प्रवास आहे, जो अवघ्या काही सेकंदात आपला प्रवास पूर्ण करतो? होय, असे एक विमान आहे, जाणून घ्या जगातील सर्वात छोट्ा विमान प्रवासाबद्दल...


 


अवघ्या 74 सेकंदात पोहोचते विमान


एक असा विमान प्रवास... जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अवघ्या 74 सेकंदात पोहोचते. ही जगातील सर्वात लहान उड्डाण आहे, जी Loganair द्वारे चालवली जाते.स्कॉटलंडमधील वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रेच्या ऑर्कने बेटांदरम्यान हे फ्लाइट उडते. या अनोख्या स्कॉटिश फ्लाइटने आपला संपूर्ण प्रवास अवघ्या दीड मिनिटात पूर्ण केला. या फ्लाइटची माहिती सोशल मीडियावर समोर आली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या..


 


प्रवास काही सेकंदात पूर्ण, 1 मिनिटापेक्षा कमी वेळ


ही माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की या दोन ठिकाणांमधील अंतर कापण्यासाठी या फ्लाइटला कधीकधी 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. आतापर्यंत नोंदवलेला सर्वात कमी वेळ 53 सेकंद आहे. हा उत्कृष्ट विक्रम पायलट स्टुअर्ट लिंकलेटरच्या नावावर आहे. या मार्गावरील उड्डाणे 1967 मध्ये सुरू झाली होती, ज्याने जगातील सर्वात कमी उड्डाणाचा विक्रम मोडला आहे. ही फ्लाइट शनिवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस चालते.


 


 






 


सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर


हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्याला 167,050 वेळा लाईक करण्यात आले आहे. स्टुअर्ट लिंकलेटरने आतापर्यंत 12,000 पेक्षा जास्त वेळा उड्डाण केले आहे, जो आतापर्यंतचा एक मोठा विक्रम असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. सर्वात जलद उड्डाण वेळेचा विक्रम अजूनही लिंकलेटरच्या नावावर आहे. हे उड्डाण अंदाजे 2.7 किलोमीटरचे अंतर कापते. या उड्डाणासाठी ब्रिटन-नॉर्मन BN2B-26 आयलँडर विमान वापरले जाते, ज्यामध्ये 10 लोक बसू शकतात. एवढेच नाही तर हे उड्डाण इतके लहान आहे की पायलटला विमान उडवताना दिसत आहे. पापा वेस्ट्रेमध्ये 70 लोक राहतात, जे त्यांच्या गरजांसाठी या फ्लाइटवर अवलंबून आहेत. या उड्डाणाने गेल्या वर्षभरात अनेक पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले असून त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे.


 


हेही वाचा>>>


Viral: 15 फूट खोल विहीर..खोल पाण्यात नवरा-बायको गाडीसह पडले.. अचानक 'असा' घडला चमत्कार! सर्वांच्या भुवया उंचावल्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )