दिवाळी म्हटलं की दिवे, फटाके, खरेदी याबरोबरच सर्वात महत्वाचं म्हणजे फराळ... मात्र वृत्तपत्रामध्ये फराळ खाणं जीवघेणं ठरु शकतं का? मासिक आणि वर्तमानपत्रातून फराळ खाल्यानं कॅन्सरचा धोका असतो का?
खमंग चकल्या, चविष्ट चिवडा, गोड लाडू असे एक ना एक पदार्थ घरी बनत असतील... पण हे पदार्थ जर तुम्ही वर्तमानपत्र म्हणजेच पेपरमध्ये खात असाल तर थोडं थांबा... वर्तमानपत्रात फराळ खाल्याने भयानक आजार होत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

मासिकं किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थामध्ये सहज शोषली जाते. शाईमधील ग्राफाईट हा घटक घातक असल्यामुळे कॅन्सरचा धोकाही असतो.
दिवाळीत फराळ तयार करताना तेल टिपण्यासाठी किंवा फराळ खाण्यासाठी अगदी सहजपणे अशा प्रकारे वर्तमानपत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे वायरल होणाऱ्या मेसेजची पजताळणी करण्यासाठी आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांशी बातचीत केली.
अशाप्रकारे फराळ वर्तमानपत्रावर ठेवून खाल्ल्यामुळे पोटांचा विकार होण्याचा धोका असल्याचं डॉक्टरही सांगतात. त्यामुळे दिवाळीचा आनंद घ्या, मनसोक्त फराळ ही खा. पण हे सर्व करत असताना आपल्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड मात्र करु नका.