वापरलेली चहा पावडर फेकून देत असाल तर हे वाचा
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 12:39 PM (IST)
1
उरलेली चहापावडर सुकवून तिचा खत म्हणूनही वापर करता येतो.
2
काबुली चण्याची भाजी करताना त्यात ही पावडर वापरल्यास चण्याला लकाकी येते.
3
पुनर्वापर करण्यापूर्वी चहा पावडर स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे.
4
आपण चहा केल्यानंतर वापरलेली चहा पावडर फेकून देतो. पण असे न करता त्याच्या पुनर्वापर करणं सहज शक्य आहे. या वापरलेल्या चहा पावडरचेही अनेक फायदे आहेत.
5
चहा पावडरमध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे वापरलेली चहा पावडर जखमेवर लावल्यास घाव लवकर भरुन येतो.
6
चहा पावडर पुन्हा उकळून स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवल्यास फर्निचरची साफसफाई करताना त्याचा वापर करता येईल. या पाण्यामुळे फर्निचर चमकदार होईल.
7
चहा पावडर एक उत्तम कंडिशनर असल्याने केस धुतल्यास ते चमकदार आणि मऊ होतील.