Travel : चोहीकडे हिरवा निसर्ग... विना अडथळ्याचा प्रवास.. ओठांवर प्रवासातील गाणी..व्यस्त जीवनातून ब्रेक घेऊन तुम्हीही कधीतरी या पावसात प्रवास करायला कोणाला आवडणार नाही, मात्र सध्या ट्राफीक जाम, पर्यटन स्थळांवर लोकांची गर्दी पाहता मान्सूनमध्ये प्रवासाला थोडा विराम लागतो, अनेकदा आपण पाहतो, पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक थांबते, त्यामुळे या ठिकाणी जाण्याचा धोका जर तुम्ही घेतला नाही तर उत्तम ठरेल. मात्र, काही ठिकाणं अशी आहेत की, जिथे फिरण्याची खरी मजा पावसाळ्यातच येते. ही ठिकाणं तर अप्रतिमच आहेत, पण इथपर्यंत पोहोचण्याचा मार्गही अतिशय सुंदर आणि सुरक्षित आहे.


 


तुमची पावसाळी पिकनिक संस्मरणीय बनू शकते


अनेकदा असं होतं पावसाळ्यात प्रवासाचे नियोजन कधी कधी तुम्हाला अडचणीत आणू शकते. या सीझनमध्ये हिल स्टेशनवरील लोकांची गर्दी पाहता त्या ठिकाणी जाण्याची कल्पना अजिबात योग्य ठरत नाही, पण काही ठिकाणं अशी आहेत, जिथे पावसाळ्यात सौंदर्य अगदी फुलून आलेले असते. मित्रांसोबत येथे रोड ट्रिपचे नियोजन करणे तुमची सहल मजेदार आणि संस्मरणीय बनवू शकते.





मुंबई ते गोवा


मुंबई ते गोवा हा मार्ग पावसाळ्यातील रोड ट्रिपसाठी सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे. 'दिल चाहता' चित्रपटाने हा महामार्ग आणखी लोकप्रिय केला आहे. या मार्गांवरून प्रवास करताना विविध प्रेक्षणीय स्थळं पहायला मिळतात की, जणू हा प्रवास कधीच संपत नाही. या रोड ट्रिपमध्ये, तुम्ही आरामात प्रवास करू शकाल, तसेच विविध ठिकाणी थांबून आणि फोटोग्राफीचा आनंद सुद्धा घेऊ शकता




बंगलोर ते उटी


पावसाळ्यातील सुंदर आणि सुरक्षित रस्त्यांपैकी एक म्हणजे बंगलोर ते उटी. या प्रवासादरम्यान, विस्तीर्ण हिरवाई, पर्वत आणि धबधबे तुमचं शरीर आणि मन ताजेतवाने करतात. या मार्गावर तुम्हाला दृश्यांसह विविध प्रकारची चव चाखायला मिळेल. इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा तुमच्या डेस्टीनेशन पेक्षाही सुंदर आणि संस्मरणीय आहे.





उदयपूर ते माउंट अबू


उदयपूर हे राजस्थानमधील अतिशय सुंदर शहर आहे. राजस्थानातील बहुतेक शहरे उन्हाळ्यात तापत असताना, पावसाळ्यातील सरी केवळ उष्णताच थंड करत नाहीत तर या ठिकाणांच्या सौंदर्यातही भर घालतात. जर तुम्ही राजस्थानात तुमच्या कारने माउंट अबूच्या दिशेने गेलात, तर उदयरपूर ते माउंट अबू हा प्रवास तुम्हाला वर्षानुवर्षे आठवेल.


 


 


हेही वाचा>>>


Travel : 'मुंज्या' चित्रपटात दिसणारं महाराष्ट्रातील 'ते' सुंदर गाव! मान्सून पिकनिकसाठी Best ऑप्शन, कलाकरांनाही भुरळ


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )