Travel : सुट्टीचे दिवस असल्याने जर तुम्ही कुटुंबासोबत चार धाम यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर थांबा... आधी नोंदणी केली का? किंवा केली नसेल तर ती कशी करायची हे माहित आहे का? जर नाही.. तर आम्ही तुम्हाला आज चारधाम यात्रेला जाण्यासाठी कशा प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता, याची माहिती देणार आहोत. जर तुम्हाला उत्तराखंडच्या चार धामांनाही भेट द्यायची असेल, तर त्वरित नोंदणी करावी लागेल, कारण सर्व भाविकांना उत्तराखंड पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करणे अनिवार्य असेल. त्याशिवाय तुम्ही येथे प्रवास करू शकणार नाही. खरं तर 10 मे पासूनच ही चार धाम यात्रा सुरु झाली आहे. पण जरी तुम्हाला आता जायचं असेल तर ही नोंदणी आवश्यक असणार आहे. नोंदणीमुळे यात्रेकरूंचा मागोवा घेण्यास आणि त्यांचे निरीक्षण करण्यात मदत होते.
भाविकांनो... नोंदणीशिवाय चारधाम यात्रेचा विचार करणे शक्य नाही
यंदा चारधाम यात्रेला जाण्याचा विचार करत असाल, तर नियोजनाशिवाय येथे प्रवास करणे त्रासदायक ठरू शकते. याचे कारण म्हणजे उन्हापासून आराम मिळावा तसेच धावपळीच्या जीवनातून ब्रेक घेण्यासाठी हा प्लॅन अनेकांकडून केला जातोय. दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उत्तराखंड आणि हिमाचल ही आवडती उन्हाळी ठिकाणे आहेत. त्यामुळे आजकाल येथे गर्दी पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत नोंदणीशिवाय चारधाम यात्रेचा विचार करणे शक्य नाही. दुसरे म्हणजे, चेक पॉईंटवरून नोंदणी न करता येणाऱ्यांनाही सरकार माघारी फिरवत आहे. उन्हाळ्यात अशी कोणतीही गैरसोय सहन करायची नसेल, तर चारधाम यात्रेसाठी पूर्वनियोजित संकेतस्थळावरून नोंदणी करणे उत्तम ठरेल. यानंतर दिलेल्या तारखेनुसार सहलीचे नियोजन करा.
चारधाम यात्रेसाठी नोंदणी कशी करावी?
तुम्ही उत्तराखंड पर्यटन विभागाची वेबसाइट registrationandtouristcare.uk.gov.in वर जाऊन चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी करू शकता.
यासाठी registrationandtouristcare.uk.gov.in वर जा.
नोंदणी किंवा लॉगिन बटणावर क्लिक करा.
तुमचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी यासह आवश्यक माहिती भरा.
यानंतर, तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येईल, तो वेबसाइटवर नियुक्त केलेल्या ठिकाणी प्रविष्ट केल्यानंतर, नोंदणी पूर्ण होईल.
यानंतर, एक नवीन डॅशबोर्ड उघडेल, जिथे प्रवासाची तारीख, लोकांची एकूण संख्या, भेट देण्यासाठी तीर्थक्षेत्रे यासारखी प्रवासाशी संबंधित सर्व माहिती दिसेल.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक नोंदणी क्रमांक देखील पाठविला जाईल.
त्यानंतर तुम्ही चार धाम यात्रेसाठी नोंदणी कार्ड डाउनलोड करू शकता.
तथापि, आपण पर्यटन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 0135-1364 वर कॉल करून देखील नोंदणी करू शकता. यासोबतच टुरिस्टकरेरतारखंड मोबाईल ॲपद्वारेही नोंदणी करता येणार आहे.
हेही वाचा>>>
Travel : Besties सोबत काहीतरी तुफानी करायचंय? भारतातील 'या' ठिकाणी टॉप रिव्हर राफ्टिंग करा, मूड फ्रेश करा..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )