Indian Railway Travel: शक्यतो लांबचा प्रवास असेल तर प्रवाशांकडून भारतीय रेल्वेचा पर्याय निवडला जातो. कारण हा प्रवास अत्यंत आरामदायी, कमी खर्चात आणि प्रवाशांना हव्या त्या श्रेणीमध्ये करता येतो. ज्यामुळे भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्यासाठी अनेक लोक स्वतःसाठी तिकीट बुक करतात, परंतु काही वेळा गर्दीमुळे कन्फर्म तिकीट मिळत नाही. अशावेळी तत्काळ तिकीट बुकिंग हा योग्य पर्याय आहे. पण तत्काळ तिकीट बुक करणे इतके सोपे नाही, हे तुम्हाला माहीत आहे का? काही छोट्या चुकांमुळे तिकीट कन्फर्म होत नाही आणि वेटिंग लिस्टमध्ये जाते. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
IRCTC मोबाईल ॲप वापरा
-तुम्ही जेव्हाही तत्काळ तिकीट बुक करता, तेव्हा नेहमी IRCTC मोबाइल ॲप वापरा. हे तुम्हाला जलद बुक करण्यात मदत करते. अनेकांना याची माहिती नसते, त्यामुळे विलंब होतो आणि तिकीट कन्फर्म होत नाही.
-IRCTC ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर, होम पेजच्या तळाशी असलेल्या ‘More’ वर क्लिक करा. बायोमेट्रिक वेरिफिकेशन चालू करा. असे केल्याने, लॉगिन करताना कॅप्चा आणि ओटीपीला बायपास केले जाऊ शकते, ज्यामुळे तत्काळ बुकिंग दरम्यान तुमचा वेळ वाचतो.
-IRCTC ॲपच्या होम पेजवर, 'अकाऊंट' वर क्लिक करा. ‘माय मास्टर लिस्ट’ मध्ये नाव, वय आणि लिंग यासारखे तपशील आगाऊ भरा. यामुळे तत्काळ बुकिंग करताना वेळेची बचत होते.
जलद इंटरनेट आवश्यक
नेहमी लक्षात ठेवा की, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी फास्ट इंटरनेट खूप महत्वाचे आहे. हे तपासण्यासाठी तुम्ही पिंग टेस्ट रन करू शकता. यासाठी तुम्ही Google वर जाऊन meter.net वापरू शकता. जर पिंग 100ms पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ कनेक्शन हळू आहे. अशावेळी चांगले सिग्नल असलेल्या भागात जा किंवा वायफाय वापरा.
ऑटो अपग्रेडेशन निवडा
बुकिंगच्या वेळी, जर तुम्हाला कन्फर्म तिकीट हवे असेल, तर प्रवाशांच्या तपशीलात ‘ऑटो अपग्रेडेशन’ वर क्लिक करा. असे केल्याने, जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये तिकीट बुक केले आणि तिकीट उपलब्ध नसेल तर तुम्हाला एसी क्लासच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली जाईल, तेव्हा तुम्ही ते अपग्रेड करू शकता.
हेही वाचा>>>
Winter Travel: मुंबई-ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर 'ही' मनमोहक ठिकाणं, थंडीत वीकेंड डेस्टिनेशन पॉइंट बनवू शकता...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )