Shah Rukh Khan Security : अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देऊन 50 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. वांद्रे पोलिसांच्या तपासात असं समोर आलं आहे की, आरोपी फैजान खान याने अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची माहिती काढली होती. आरोपी फैजान खान याला रायपूरमधून अटक करण्यात आली होती. 


अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा


आरोपींनी ऑनलाइन सर्च करून शाहरुख खानची सुरक्षा आणि मुलगा आर्यन खान यांची बरीच माहिती गोळा केली होती. आरोपीकडे असलेल्या दुसऱ्या मोबाईलच्या तपासात ही बाब समोर आली आहे. बांद्रा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना शाहरुखच्या सुरक्षेबद्दल आरोपीने त्याच्या मोबाइलवरून मुलगा आर्यन याविषयी ऑनलाइन माहिती गोळा केली होती. आरोपीने ही माहिती का गोळा केली, याचं समाधानकारक उत्तर त्यानं दिलेलं नाही. 


आरोपीकडून आर्यन खानबद्दल मोठा खुलासा


वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ऑनलाइन जस्ट डायलद्वारे वांद्रे पोलिस स्टेशनचा लँडलाइन नंबर मिळवला होता आणि त्यानंतर त्याने धमकीचा कॉल केला होता. वांद्रे पोलिसांच्या तपासात असंही समोर आलं आहे की, आरोपींनी शाहरुखला धमकावण्यासाठी जो मोबाईल वापरला होता, तो मोबाईल आठवडाभरापूर्वी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी खरेदी केला होता.


शाहरुख खान धमकी प्रकरणात एक जण अटकेत


अभिनेता सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर अभिनेता शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. शाहरुख खानला आलेल्या धमकी प्रकरणात रायपूरमधून एका आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. फैजान खान असं या व्यक्तीचं नाव असून मुंबई पोलिसांनी या व्यक्तीला शाहरुख खान धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरु होती. आता आरोपीच्या चौकशीमध्ये अपडेट समेर आली आहे. आता पोलिस पुढील तपास करत आहेत.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


वांद्रे पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबर अभिनेता शाहरुख खानला धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने शाहरुख खानला आपला जीव वाचवायचा असेल तर 50 लाख रुपये देण्याची मागणी करत परिणाम भोगावे लागतील, असं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याच क्रमांकावर फोन केला असता आरोपीने फोन बंद केला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(4) आणि 351(3)(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Celebs Death Threats : सलमान खानसोबत 'या' स्टार्सच्या जीवालाही धोका, धमकीनंतर सुरक्षेत वाढ