Tips To Prevent Hair Fall: केसगळती (Hair Fall), कोंडा (Dandruff), रफ हेअर्स (Rough Hairs) अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला जाणवत असतील. केसांची निगा (Hair Care) राखणे अत्यंत गरजेचे असते. केस आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुवावेत. केसांवर विविध प्रोडक्ट्सचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा (Hair Care Tips). केमिकल्स असणारे शॅम्पू, कंडिशनर वापरणे टाळावे. अनेक लोक केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळतात (Towel). पण केस धुतल्यानंतर ते लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्यानं तुम्हाला कोंडा, इंफेक्शनचा सामना करावा लागू शकतो. हेअर वॉशनंतर केस टॉवेलमध्ये गुंडाळल्यानं होणाऱ्या समस्यांबद्दल जाणून घेऊयात...


ओले केस टॉवेलमध्ये बराच वेळ गुंडाळल्याने होणाऱ्या समस्या-



  • ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच वेळ ओले राहते. त्यामुळे कोंडा होऊ शकतो.

  • केस धुतल्यानंतर ते टॉवेल गुंडाळल्याने स्कॅल्पला फंगल इंफेक्शन (Fungal infection) होऊ शकते. 

  • ज्यांना केस गळण्याची (Hair Fall) समस्या आहे त्यांनी ओल्या केसांना चुकूनही टॉवेल गुंडाळू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळल्यानं केस तुटतात. 

  • ओल्या केसांना टॉवेल बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात तसेच केस गळण्याची समस्याही वाढते.

  • ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांचा नॅचरल शाइन निघून जातो. तसेच केस कोरडे होऊ शकतात. 


अशी घ्या केसांची काळजी


आठवड्यातून 2-3 वेळा केसांना तेलाने मसाज करावा. तसेच आठवड्यातून 2-3 वेळा केस स्वच्छ धुवावेत. 2-3 पेक्षा जास्त वेळा केस धुवू नका. कारण सतत केस धुतल्यानं शॅम्पूमुळे केस कोरडे होतात. अथवा काही वेळ केस मोकळे सोडले तरी देखील ते ड्राय होतात. केस धुतल्यानंतर थोड्यावेळ मोकळे सोडा. त्यानंतर ड्रायरनं तुम्ही केस ड्राय करु शकता.  अशा पद्धतीनं केस ड्राय केल्यानं केसांवरील नॅचरल शाइन (Natural Shine) निघून जाणार नाही. 


चेहऱ्यावर टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेचं नुकसान होतं. चेहऱ्यावर टॉवेल घासल्यानं त्वचेच्या पेशींचं नुकसान होतं. त्यामुळे चेहऱ्यावर टॉवेल रगडण्याची सवय सोडून द्या. चेहरा कोरडा करताना हळूवारपणे चेहऱ्यावर पुसावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :


Hair Oil : केस घनदाट करण्यासाठी 'या' केसांच्या तेलाचा वापर करा; आश्चर्यकारक फायदे मिळतील