वॉशिंग मशिन, टेबल फॅन, इस्त्री आदी उपकरणं ठरु शकतात धोकादायक
वॉशिंग मशिनमध्ये पडल्यामुळे दिल्लीत तीन वर्षांच्या जुळ्या भावांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील रोहिणी भागातल्या अवंतिका कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवॉशिंग मशिन : लहान मुलांसमोर वॉशिंग मशिनचा वापर अतिशय धोकादायक ठरु शकतो. यामध्ये घुसळणारे पाणी पाहून जर एखादं मुल मशिन जवळ गेलं, तर तो जखमी होऊ शकतो, किंवा ते त्याच्या जीवावरही बेतू शकतं. दिल्लीच्या रोहिणी परिसरातील घटना याचंच उदाहरण आहे.
टेबल फॅन : सध्या उन्हाळा जवळ येत असल्यानं, अनेकांच्या घरातील पंखे फिरत आहेत. उकाड्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काहीजण टेबल फॅनचाही वापर करत आहेत. पण तुम्ही टेबल फॅनचा वापर करत असाल, तर सावधान! कारण टेबल फॅनची पाती फिरताना पाहून त्यात मुलानं बोट घालण्याचा धोका संभवतो.
इस्त्री : प्रत्येकाच्या घरात दिसणारे हे असं उपकरण आहे, ज्याचा दैनंदिन वापरात सर्रास होतो. घरातला प्रत्येकजण आपले कपडे प्रेस करण्यासाठी इस्त्रीचा वापर करतो. विशेष म्हणजे, कपडे प्रेस करण्यासाठी काहीजण अंथरुणाचा आधार घेतात. पण इस्त्रीचा असा वापर धोकादायक ठरु शकतो.
हीटर : अनेकांना गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. यासाठी काहीजण हीटरचा वापर करतात. यात काहीजण निष्काळजीपणा करत आपल्या अंथरुणाजवळच पाणी गरम करण्यासाठी लावतात. पण यावेळी जर तुमच्या मुलानं त्यामध्ये हात घातला, तर त्याला शॉक लागण्याचा धोका संभवतो.
हेअर ड्रायर : आता तर प्रत्येकाच्याच घरात हेअर ड्रायर पाहायला मिळतात. पण एखाद्या मुलाच्या हातात जर ते पडलं, तर ते कितपत धोकादायक ठरु शकतं, याचा विचार तुम्हीच करा. कारण हेअर ड्रायरमुळंही अनेक दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
गिझर : गिझरमुळे सासू आणि सुनेचा मृत्यू झाल्याची काही दिवसांपूर्वीच एक बातमी होती. या घटनेत तीन वर्षांचा मुलगा अनाथ झाला. गिझरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना समोर आल्याने त्यापासून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
पॉवर स्विच/ प्लग : अतिरिक्त वीज खर्चणाऱ्या साहित्यासाठी जास्तीचा वीजपुरवठा गरजेचा असतो. त्यामुळे घराघरात पॉवर स्विचचा वापर आता सर्वत्रच होतोय. पण जर तुम्ही पॉवर प्लग अतिशय खाली लावत असाल, तर सावधान! कारण लहान मुलं खेळण्याच्या नादात त्याच्या छिद्रात बोटं घालू शकतो. यात त्या मुलाला हाय व्होलटेचा वीजेचा धक्का त्याला बसू शकतो.
या घटनेनंतर तुम्ही तुमच्या घरात वापरत असलेली उपकरणं कितपत धोकदायक आहेत, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. तेव्हा आज आम्ही तुम्हाला, तुमच्या घरातली जी उपकरणं सर्वात धोकादायक आहेत, याबद्दल सांगणार आहोत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -