मुंबई: भारतामध्ये सोन्याप्रमाणं चांदीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पण चांदीच्या वस्तू बऱ्याचदा काळ्या पडतात. त्यामुळे त्यांना चमकविण्यासाठी बरीच मेहनतही घ्यावी लागते. सोगानी ज्वेलर्सच्या एमडी प्रीती सोगानी यांनी चांदीच्या वस्तू काळेपणापासून कशा वाचविता येतील याच्या काही खाल टीप्स सांगितल्या आहेत.


- चांदीच्या वस्तू साफ करण्यासाठी नेहमी सुक्या आणि मुलायम कपड्याचा वापर करा. कोणत्याही केमिकल किंवा अॅसिडसारख्या गोष्टी वापरू नका.

- चांदी हा फारच कोमल असा धातू आहे. त्यामुळे शक्यतो अस्वच्छ हाताने त्याला हात लावू नका, हात लावण्यापूर्वी शक्यतो कापडी हातमोजे घाला.

- चांदीच्या वस्तू साफ करण्यासाठी मीठ हे सर्वात उपयुक्त आहे.

- चांदीच्या वस्तूला स्वच्छ जागी ठेवा. तसेच बटर पेपरमध्ये या वस्तू बांधून ठेवा.

- चांदीच्या वस्तू कधीही प्लॅस्टिकमध्ये ठेऊ नका. तसेच गरम वस्तूच्या ठिकाणी ठेऊ नका.

- टूथपेस्ट चांदी चांगली साफ करते. फक्त टूथपेस्ट चांदीवर लावा आणि गरम पाण्यानं धुऊन घ्या.

- बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चांदीच्या वस्तूंवर लावून नतंर ते एका स्वच्छ कपड्यानं पुसून घ्या. यामुळे चांदीची दुप्पट चमक दिसेल.