Corona Virus : देशात आणि जगात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) कहर अजूनही संपलेला नाही. यूएस संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथनी फौसी यांच्या मते, कोरोना विषाणूची महामारी अद्याप संपलेली नाही आणि लवकरच ओमिक्रॉनचे नवीन व्हेरियंट देखील पुन्हा धुमाकूळ घालू शकतात. सीएनबीसीच्या मते फौसी म्हणाले की, यूएसमध्ये सुमारे 25 किंवा 30 टक्के नवीन संक्रमण BA.2 सब व्हेरियंटमुळे होते आणि हे लवकरच संक्रमणाचे मुख्य कारण बनू शकते.
फौसी म्हणाले की, त्यांना या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. परंतु, इतर प्रकारांप्रमाणे या व्हेरियंटमध्ये मोठी वाढ होईल, असे नाही. ओमिक्रॉनपेक्षा BA.2 सब व्हेरियंट सुमारे 50 ते 60 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. परंतु, ते अधिक गंभीर दिसत नाही, असे अमेरिकेचे अध्यक्षीय कार्यालय व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार फौसी म्हणतात.
अनेक भागांमध्ये वाढला संसर्ग!
‘जेव्हा तुम्ही या संसर्गाची प्रकरणे पाहता, तेव्हा ती अधिक गंभीर दिसत नाहीत आणि ते लस किंवा पूर्वीच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीपासून वाचू शकत नाहीत’, असे ते म्हणाले. या व्हेरियंटमुळे चीन आणि यूकेसह युरोपमधील अनेक भागांमध्ये संसर्गाची प्रकरणे आधीच वाढली आहेत. आरोग्य अधिकारी यावर जोर देत आहेत की, कोरोना व्हायरस लस आणि बूस्टर डोस हे एखाद्या व्यक्तीला संसर्गामुळे अधिक आजारी होण्यापासून रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
इतर यूएस आरोग्य तज्ज्ञ देखील अत्यंत संसर्गजन्य BA.2 प्रकाराबद्दल सतत चेतावणी देत आहेत. यूएस सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, नवीन व्हेरियंट कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकरणांना गती देऊ शकतो, परंतु दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत अमेरिका याला चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी अधिक तयार आहे. ते म्हणाले की, आपल्याला देखील तयार राहावे लागेल. कोरोना अजून गेलेला नाही. आपले लक्ष याच्यावर मात करण्यावर असले पाहिजे, घाबरण्यावर नाही!’
नवा व्हेरियंट घालू शकतो धुमाकूळ!
स्कॉट गॉटलीब, फार्मास्युटिकल कंपनी फायझरचे बोर्ड सदस्य आणि माजी FDA प्रमुख, असेही म्हणतात की, नवीन व्हेरियंट संक्रमणास गती देईल. परंतु, यामुळे नवीन लाट येण्याची अपेक्षा नाही. दरम्यान, अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी संसर्गाची 31,200 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 958 लोकांना कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : सावधान! सकाळी रिकाम्या पोटी 'या' गोष्टी करू नका, शरीरासाठी ठरेल घातक
- Health Tips : रोज ओट्स खाल्ल्याने आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे, वजनही होईल कमी
- Health Tips : स्मरणशक्ती वाढवायचीय? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha