मुंबई : फेब्रुवारी महिना म्हटल की वॅलेंटाइन वीकची जगातील सर्वच कपल आतुरतेने वाट पाहत असतात. वॅलेंटाइन वीकमध्ये रोज डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डे नंतर टेडी डे साजरा केला जातो. टेडी बिअर हा सर्वांचा लाडका आहे. परंतु या टेडीची सुरूवात कशी झाली? हे जाणून घेणार आहोत.


टेडीची सुरूवात अमेरिकेतून झाली


टेडी बिअरची सुरूवात अमेरिकेतून सुरू झाली. जेव्हा मिसीसिपी आणि लुझियानातील सीमा वाद समोर आला होता. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष थेयोडोर रुझवेल्ट होते. रूझवेल्ट हे अमेरिकेचे 26 वे अध्यक्ष होते. रुझवेल्ट एक राजकारणी होतेच त्याचबरोबर ते एक चांगले लेखक देखील होते. मिसिसिपी आणि लुझियानातील वाद मिटविण्यासाठी रुझवेल्ट मिसिसिपीच्या भेटीला गेले होते. समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी मोकळ्या वेळात मिसिसिपी जंगलाला भेट दिली.


या वेळी त्यांनी झाडाला बांधलेल्या जखमी अस्वलाला पाहिले. या अस्वलाला कोणीतरी बांधले होते. अस्वल तळमळत होता. रुझवेल्टने अस्वलाला सोडले पण त्याला गोळी घालण्याचा आदेश दिला. जेणेकरून त्याला त्रासातून आराम मिळू शकेल. अमेरिकेत या घटनेची सर्वत्र चर्चा होती. या घटनेशी संबंधित एक व्यंगचित्र एका नामांकित वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. हे व्यंगचित्र व्यंगचित्रकार बेरीमन यांनी बनविलेले अस्वल लोकांना आवडले.


अमेरिकेच्या टॉय स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम अस्वलच्या व्यंगचित्रातून इतके प्रभावित झाले. त्यांनी या अस्वलाचा आकार असलेले एक खेळणे त्याचे नाव टेडी बिअर ठेवले. त्याचे नाव रुझवेल्ट असे ठेवले गेले. कारण रुझवेल्ट यांचे टोपणनाव 'टेडी' होते.


राष्ट्रपतींकडून त्यांच्या नावावर हे खेळण्याचे नाव ठेवण्याची परवानगी मिळाल्यानंतर ते बाजारात आणले गेले. लोकांना ते इतके आवडले की त्याची विक्री लगेच झाली. तेव्हापासून हे नाव लोकप्रिय झाले आहे. जगातील पहिले टेडी बिअर अजूनही इंग्लंडच्या पीटरफिल्डमध्ये सुरक्षित ठेवले आहे. 1984 मध्ये ठेवले आहे.


संबंधित बातम्या :



Valentine Week 2021: 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये 'त्या' खास व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी सज्ज आहात ना?


व्हॅलेन्टाईन डे निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्डवर क्लिक करताय.... मग सावधान; सायबर पोलिसांचे आवाहन