Happy Teachers Day 2023 Quotes : गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः.. गुरुर्देवो महेश्वरः.. गुरुः साक्षात् परं ब्रह्म...तस्मै श्री गुरवे नमः..प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम आई-वडिलांनंतर शिक्षकच (Teachers Day 2023) करत असतात, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील हे अनमोल नाते दृढ करण्यासाठी, तसेच शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारतात शिक्षक दिन दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये, इतर ठिकाणी विविध सांस्कृतिक आणि सन्मान कार्यक्रम आयोजित केले जातात. शिक्षक दिनाच्या विशेष प्रसंगी, तुम्ही तुमच्या शिक्षकांना शिक्षक दिन संदेश पाठवून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देखील देऊ शकता...


शिक्षक दिन 5 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो?


भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. 1888 मध्ये या दिवशी स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती तसेच पहिले उपराष्ट्रपती, एक प्रसिद्ध विद्वान, भारतरत्न, भारतीय संस्कृतीचे मार्गदर्शक, शिक्षणतज्ज्ञ होते. प्रत्येकाने शिक्षणाला वाहून घेतले पाहिजे, असा त्यांचा नेहमीच विश्वास होता. ते म्हणाले होते की, प्रत्येकाने सतत शिकण्याची प्रवृत्ती कायम ठेवावी.


शिक्षक दिनाचे खास औचित्य 


"ज्या व्यक्तीकडे ज्ञान आणि कौशल्य दोन्ही असते, त्या व्यक्तीसमोर नेहमीच काही ना काही मार्ग खुला असतो," असे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत असत. शिक्षक दिनाचे औचित्य खास बनवण्यासाठी, तुम्ही तुमच्या शिक्षकांना येथे दिलेले शिक्षक दिनाचे संदेश पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकता.


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः.
गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः..
गुरू ब्रह्मा, गुरू विष्णू, गुरूच शंकर.
गुरू हेच खरे परब्रह्म, त्या सद्गुरूंना माझा नमस्कार असो.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


"एक चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे असतो, 
स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो."
"गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. 
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरुराया.. 
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"


"शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही, 
आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही."
"नवीन शिक्षक होणे हे विमान तयार करताना ,
विमान उडवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे."


"शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत,
ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात, 
परंतु इतरांना त्यांच्या लक्षाकडे घेऊन जातात."
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा"


"शि.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ, 
हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक 
अशा सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा"


"आई गुरु आहे, 
बाबाही गुरु आहे. 
विद्यालयातील शिक्षक गुरु आहेत. 
आयुष्यात ज्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं
त्या सर्व व्यक्ती गुरु आहेत. 
या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम."


हेही वाचा


Teachers Day 2023: भारतात शिक्षक दिनाची सुरुवात कशी झाली? 5 सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या