Surya Namaskar Benefits : या धावपळीच्या काळात आपली जीवनशैली इतकी बदलली आहे की आपण स्वतःसाठी एक तासही काढू शकत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दिवसभर डेस्कवर बसल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांचा धोका वाढतो. पण योग तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो.


शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगासने अनेक वर्षांपासून ओळखली जातात. योगासनांच्या फायद्यांमुळे ते जगभरात लोकप्रिय होत आहे. सूर्यनमस्कार (Surya Namaskar) हा एक असा योग आहे, जो तुम्हाला निरोगी राहण्यासाठी खूप मदत करू शकतो. यासाठी तुम्हाला दररोज फक्त 10 मिनिटे द्यावी लागतील. तसेच, सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि नेहमी रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करा. चला जाणून घेऊयात रोज सूर्यनमस्कार केल्याने कोणते फायदे होतात.


शरीर मुद्रा


सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या संपूर्ण शरीराची स्थिती सुधारते. हे तुमच्या स्नायूंसाठी फायदेशीर आहे. मणक्याचे दुखणे, मानदुखी आणि पाठदुखीपासूनही आराम मिळतो. दररोज सूर्यनमस्कार केल्याने मणक्याचे संरेखन देखील सुधारते, ज्यामुळे शरीराची मुद्रा चांगली राहते. लवचिकता देखील वाढते आणि स्नायू मजबूत आणि चांगल्या स्थितीत दिसतात.


मानसिक शांती


या धावपळीच्या जीवनात आपल्या सर्वांना एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे मानसिक तणावापासून मुक्तता. दररोज सूर्यनमस्कार केल्याने तुमचे मन शांत होते आणि तुमचा ताणही कमी होतो. याबरोबरच निद्रानाशाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. यामुळे तुमचा फोकस देखील सुधारतो.


हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर


दररोज सूर्यनमस्कार करणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सूर्यनमस्कार केल्याने रक्ताभिसरण वाढते. यामुळे तुमच्या हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्त अधिक चांगले पंप होऊ शकते.


वजन कमी करण्यास उपयुक्त


सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि निरोगी वजन राखण्यास मदत होते. असे केल्याने, पचन देखील सुधारते आणि चयापचय जलद होते, ज्यामुळे कॅलरी लवकर बर्न होतात. रोज सूर्यनमस्कार केल्याने पचनाशी संबंधित समस्याही कमी होतात. ही सर्व कारणे निरोगी वजन राखण्यास मदत करतात.


फुफ्फुसासाठी फायदेशीर


सूर्यनमस्कार करताना श्वासोच्छवासावर विशेष लक्ष द्यावे लागते. प्रत्येक स्थितीत दीर्घ श्वास घ्यावा लागेल आणि हळूहळू श्वास सोडावा लागेल. यामुळे तुमची फुफ्फुस मजबूत होते आणि तुमच्या फुफ्फुसाची क्षमताही वाढते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी