Google CEO Sundar Pichai Morning Routine : बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की, विविध क्षेत्रांतील दिग्गज आहेत, त्यांचा दिनक्रम कसा असतो? आपल्यासारखाच असेल का? मग ते दररोजच्या जेवणात काय खात असतील? ते सकाळी उठल्यावर काय करत असतील? असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनात नेहमीच येतात. अशातच जगभरात नेहमीच चर्चेत असणारं व्यक्तीमत्त्व म्हणजे, गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचई (Sundar Pichai). यांच्याबाबत सर्वांनाच अनेक प्रश्न पडतात. त्यांच्याबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्याची इच्छा अनेकांना आहे. अशातच अनेकांना त्यांच्याबाबत पडलेल्या एक प्रश्न म्हणजे, सुंदर पिचईंचं मॉर्निंग रुटिन. त्यांची सकाळी कशी सुरू होते? 


जगभरातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई सकाळी उठल्यावर काय करतात? ते रोज सकाळी उठल्यावर सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रं वाचत नाहीत. ते सकाळची सुरुवात ताज्या तंत्रज्ञानाच्या बातम्यांनी करतात, ज्यासाठी ते Techmeme वेबसाईट्स वाचतात. मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. 


Techmeme ही एक टेक वेबसाईट आहे, जी एकाच प्लॅटफॉर्मवर जगभरातील टेक वेबसाईट्सची मथळे दाखवते. यामध्ये ब्लूमबर्ग (Bloomberg), सीएनबीसी (CNBC) आणि द व्हर्ज (The Verge) सारख्या नावांचा समावेश आहे. या वेबसाईटचा उद्देश उद्योगातील सर्वात महत्त्वाचे अपडेट्स प्रदान करणं हा आहे.


अनेक दिग्गज वाचतात 'ही' वेबसाईट्स 


Techmeme वेबसाईटच्या वाचकांच्या यादीत केवळ सुंदर पिचाई यांचंच नाव नाही, तर मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग (Meta CEO Mark Zuckerberg) आणि उच्च पदस्थ कार्यकारी मेटा सीटीओ अँड्र्यू बॉसवर्थ (CTO Andrew Bosworth) आणि इन्स्टाग्रामचे (Instagram) प्रमुख ॲडम मोसेरी (Adam Mosseri) हे सर्वच या वेबसाईटचं नियमित वाचन करतात.


अॅपलचे सीईओ टिम कुक आपला दिवस कसा सुरू करतात? (Apple CEO Tim Cook)


सुंदर पिचाई त्यांच्या दिवसाची सुरुवात एका वेबसाईटवरच्या टेक न्यूजच्या वाचनानं करतात, तर Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक त्यांच्या दिवसाची सुरुवात त्यांना ईमेलवर मिळालेल्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया वाचून करतात. सर्वात आधी ते वर्कआउट करतात. याशिवाय Spotify चे CEO डॅनियल एक दिवसाची सुरुवात बातम्या आणि पुस्तकांनी करतात. 


Sundar Pichai यांच्याकडून नोकरकपातीचे संकेत 


Google CEO सुंदर पिचाई यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, यंदाच्या वर्षात नोकरकपात होऊ शकते. या Layoff चा परिणाम अनेक सेक्टर्सवर होऊ शकतो. ज्यामध्ये हार्डवेयर, सेल्स, सिक्योरिटी, इंजीनियरिंग आणि Youtube या नावांचा समावेश आहे.