नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही सरबत किंवा गोड पदार्थांचं वारंवार सेवन करत असाल तर सावधान. कारण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, गोड पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

‘अल्जाइमर्स अॅन्ड डिमेंशिया’मध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनात देण्यात आलेल्य निष्कर्षानुसार गोड पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. तसेच हिप्पोकॅम्पसचं आकारमान कमी होऊ शकतं.

हिप्पोकॅम्पस मानवी शरीरातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा भाग तुमच्या शिकण्याच्या आणि स्मृती जागृत ठेवण्यास मदत करतो.

या संशोधनाचा दुसरा भाग ‘स्ट्रोक’ पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्येही अशाच प्रकारचे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. या रिपोर्टनुसार, रोज सोडा पिणाऱ्यांना स्ट्रोक किंवा डिमेंशियासारखे गंभीर आजार संभवतात.

तसेच संशोधकांनी कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या खाद्यपदार्थाबाबतही अनेक निष्कर्ष मांडले आहेत. यात त्यातील हानिकारक घटकांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या विषयात अजून संशोधन करण्याची गरज असल्याचं बोस्टन विश्वविद्यालयाचे प्राध्यापक आणि लेखक मॅथ्यू पेस यांनी सांगितलं आहे.