Skin Care Tips : प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर, तजेलदार आणि नितळ दिसावा असं वाटत असतं.  वयानुसार चेहऱ्यावर (Skin Care Tips) सुरकुत्या दिसणं साहजिक आहे. पण, वयाच्या आधीच जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील तर यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. खरंतर, जेव्हा चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात तेव्हा आपल्या त्वचेवरील कोलेजन कमी होऊ लागलं आहे असं समजावं. कोलेजन हा एक प्रकारचा प्रथिन आहे, जो त्वचेचा घट्टपणा आणि सॉफ्टनेस राखण्यासाठी आवश्यक आहे. तसेच, वाढत्या वयाबरोबर कोलेजन कमी होऊ लागते आणि त्यामुळे सुरकुत्या तयार होऊ लागतात.


जर तुमच्या चेहऱ्यावरही वयाच्या आधीच सुरकुत्या दिसत असतील तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही तेल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येवर मात करू शकता. हे उपाय कोणते ते जाणून घेऊयात. 


लेमन इसेंशियल ऑईल 


लिंबू त्वचेसाठी फार गुणकारी आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण, त्याहीपेक्षा लिंबूवर्गीय तेल आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. एका संशोधनानुसार, लिंबूच्या आवश्यक तेलामध्ये व्हिटॅमिन सी चांगली असते. अधिक व्हिटॅमिन सी म्हणजे अधिक अँटिऑक्सिडंट्स, जे कोलेजन वाढवण्यास मदत करतात. याबरोबर, त्यात एस्कॉर्बिक ॲसिड देखील असते, जे त्वचेच्या आतील थरापर्यंत पोहोचते आणि हायपर पिग्मेंटेशनला प्रतिबंध करते. एकूणच, एजिंगची समस्या दूर करण्यासाठी लिंबू आवश्यक तेल देखील प्रभावी आहे.


लैव्हेंडर इसेंशियल ऑईल 


लॅव्हेंडर तेलामध्ये अँटी-ऑक्सीडेटिव्ह आणि उपचार करणारे घटक असतात. लॅव्हेंडर खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यात मदत करते आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करते. तुम्ही लॅव्हेंडर तेल तुमच्या नाईट क्रीम किंवा सीरममध्ये मिसळून वापरू शकता. हे तेल लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर काही दिवसांतच फरक जाणवेल. 


चंदन तेल


चंदनाचे इसेंशियल तेल म्हणजेच चंदन तेल त्याच्या दाहक-विरोधी प्रभावांसाठी ओळखले जाते. चंदनाच्या तेलामध्ये 90 टक्के अल्फा आणि बीटा सेंटिनॉल असते, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास उपयुक्त आहे. तसेच, यामुळे कोलेजनचे नुकसान कमी होते.  


वय व्यतिरिक्त सुरकुत्या पडण्याची कारणे



  • शरीरात पाण्याची कमतरता

  • अनुवांशिकता

  • पोषणाचा अभाव

  • धूम्रपान

  • तणाव

  • सूर्याची धोकादायक किरणं


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' 7 लोकांच्या आहारात माशांचा समावेश नक्की असावा; हाडांच्या तंदुरुस्तीसह अनेक आजारही होतील दूर