Papaya Skin Care Tips : बहुतेकांना पपई हे फळ फारसं आवडत नाही. पण पपई आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. पपई तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. पपई टॅनिंग दूर करते. पपईचा योग्य वापर केल्यास चांगले परिणाम दिसतात. टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही पपई वापरू शकता. पपईमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. पपईच्या मदतीने तुम्ही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी चे गुणधर्म त्वचेला देऊ शकता. पपईमध्ये पॅपेन एंजाइम असते. जे त्वचेच्या मृत पेशींची समस्या दूर करते. पपईचा चेहऱ्यासाठी वापर कसा करावा याच्या काही सोप्या टिप्स खास तुमच्यासाठी. 


पपईचे फायदे :



  • पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचेवरील टॅनिंगची समस्या दूर होते.

  • पपईमध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे जळजळ होण्याची समस्या दूर होते.

  • पपईमध्ये पपईन असते, जे मुरुमांची समस्या दूर करते.

  • त्वचेच्या कोरडेपणाची समस्या आहे, पपईने तुम्ही चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करू शकता.


चेहऱ्यावर पपई कसा लावावा ? 


तुम्ही पपईमध्ये ओट्स आणि ब्राऊन शुगर मिक्स करून ते समान प्रमाणात मिसळा. आता तुम्ही त्याने स्किन स्क्रब करा. पपई केवळ टॅनिंगची समस्या दूर करत नाही तर त्वचेचा कोरडेपणाही दूर करते. पपईपासून तयार केलेला स्क्रब लावण्यापूर्वी तुम्ही हात किंवा त्वचा व्यवस्थित स्वच्छ करा. हा एक प्रकारचा बॉडी स्क्रब आहे जो तुम्ही हात, पाय, चेहऱ्यावर किंवा जिथे टॅनिंग असेल तेथे लावू शकता.



  • टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कॉफीबरोबर पपईचा वापर करू शकता. टॅनिंग दूर करण्यासाठीही कॉफी हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही पपईमध्ये कॉफी पावडर मिसळा आणि त्यात व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

  • पपईमध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. त्वचेची छिद्रे सहज स्वच्छ करण्यासाठी, तुम्ही पपईपासून क्लिंझर देखील बनवू शकता. तुमचा चेहरा खोलवर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोरफडमध्ये पपई मिसळून वापरू शकता.

  • पपई कुस्करा करा. त्यात मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. त्यात हळद आणि अंड्याचा पांढरा भाग घाला. टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही या पॅकचा वापर करू शकता. हळद टॅनिंगची समस्या दूर करण्यास मदत करते आणि त्वचेचा टोन देखील उजळ करते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha