Skin Care Tips : तूप (Ghee) हा आरोग्याचा उत्तम खजिना मानला जातो. कारण त्यात जीवनसत्त्वे आणि कॅलरीजसह अनेक पोषक घटक आढळतात. जेवणात वापरले जाणारे तूप आरोग्यासाठीही फार फायदेशीर आहे. पण, तुपाचा सौदर्यासाठीदेखील वापर केला जातो. प्राचीन काळापासून तुपाचा वापर सौंदर्यासाठी (Skin Care Tips) केला जातो. चला जाणून घेऊयात तुपाचे आश्चर्यकारक फायदे,
तुपाचे फायदे :
त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यास मदत : हिवाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी आणि निर्जीव दिसते. अशा वेळी तुम्ही तूप लावून काही मिनिटे मसाज केल्यास तुमची कोरड्या त्वचेची समस्या लवकरच दूर होऊ शकते. तूप तुमच्या कोरड्या त्वचेला नेहमी निरोगी ठेवण्यास मदत करेल.
वृद्धत्व दूर करण्यास मदत : वाढत्या वयानुसार त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही चेहऱ्यासाठी तुपाचा वापर करू शकता. हे बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तुपातील व्हिटॅमिन ई त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
त्वचा तरूण ठेवण्यास मदत : तूप त्वचेची लवचिकता वाढविण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा तरुण ठेवण्यास मदत होते.
डार्क सर्कल दूर होतात : डोळ्यांभोवती तूपाने मसाज केल्यास डार्क सर्कल दूर होतात. याबरोबरच डोळ्यांचा थकवाही दूर होतो.
ओठांना सॉफ्ट बनवतात : हिवाळ्यात ओठ खूप कोरडे होतात. व्हॅसलीन किंवा लिप केअर प्रोडक्ट्स लावल्यानंतरही कोरडेपणा जात नाही. अशा वेळी ओठांवर तूप लावल्यास ओठांचा कोरडेपणा दूर होतो.
केस चमकदार होण्यास मदत : फक्त तूप लावूनच नाही तर त्याचा आहारात समावेश केल्याने त्वचेला आणि केसांना पोषण मिळते. यामुळे त्वचा आणि केस चमकदार होतात. साजूक तूपाने टाळूला मसाज करा. त्यामुळे केस मऊ होतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि ए केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी खूप फायदेशीर आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :