Skin Care Tips For Winters : हिवाळा (Winter Season) सुरू होताच आपली त्वचा (Skin Care Tips) कोरडी होऊ लागते. कोरडेपणामुळे (Dry Skin) काही लोकांची त्वचाही काळी पडते. या समस्येचा सामना करण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. पण, तरीही त्याचा कोणताही परिणाम दिसत नाही. काही काळानंतर, त्वचा कोरडी होताच, ती पुन्हा काळी दिसू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही कोरड्या आणि काळ्या त्वचेपासून मुक्त होऊ शकता.
गुलाब पाणी वापरा
नैसर्गिक टोनर म्हणून तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. तुम्ही त्यात ग्लिसरीनचे काही थेंब टाकू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. यानंतर हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा. तुम्ही हात आणि पायांवरही लावू शकता. त्वचा मऊ करण्याबरोबरच मृत पेशी काढून टाकून ती चमकदार बनवण्यातही मदत होईल.
गरम पाण्याचा वापर कमी करा
थंडीच्या दिवसांत वातावरणात तसाच गारवा असतो. त्यामुळे अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करतात. तसेच, चेहराही गरम पाण्याने धुतात. पण, यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करा पण गरम पाण्याने चेहरा धुवू नका. दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमचा चेहरा काळवंडू शकतो आणि कोरडेपणामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते.
चेहऱ्यावर साबण लावू नका
चुकूनही चेहऱ्यावर साबण लावू नये. साबणातील रसायने त्वचेला वाईटरित्या नुकसान करू शकतात. चेहऱ्यावर साबण लावल्याने त्वचा लवकर कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. यामुळे तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक निघून जाते.
डेड स्किन काढून टाकण्यास विसरू नका
डेड स्किन काढून टाकल्याने त्वचा ताजेतवाने वाटते. त्यामुळे दररोज आंघोळीपूर्वी मृत त्वचा काढून टाका. यासाठी तुम्ही घरच्या घरी स्क्रब तयार करू शकता. दह्यामध्ये पीठ मिसळून तुम्ही स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब लावा आणि चेहरा, मान आणि पाय हलक्या हाताने मसाज करा. हे तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास आणि ती चमकण्यास मदत करतील.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.