Skin Care Tips : सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं. सणासुदीच्या काळात फॅशनबरोबरच ब्युटी प्रोडक्ट्स ट्रेंडमध्ये असतात. कधी सौंदर्याचा ट्रेंड तर कधी 5 स्टेप रुटीन समोर येतो. पण या सगळ्यात एक नवीन ट्रेंड समोर आला आहे, ज्याचं नाव आहे स्किन फास्टिंग (Skin Fasting). हा ट्रेंड इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्किन फास्टिंगचा ट्रेंड काय आहे आणि त्याचा आपल्या त्वचेला(Skin Care Tips) कसा फायदा होतो ते जाणून घेऊयात.


खरंतर, स्किन फास्टिंगच्या (Skin Fasting) वेळी, त्वचेवर वेगवेगळ्या त्वचेची काळजी घेणारे प्रोडक्ट्स वापरले जातात. विशेष म्हणजे स्किन फास्टिंगमध्ये कमीत कमी ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. यामध्ये त्वचेवर क्लिन्जर, सीरम किंवा स्क्रबसारख्या प्रोडक्ट्सचा वापर केला जात नाही.


'या' गोष्टी महत्त्वाच्या आहेत


या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्युटी ट्रेंडमध्ये फक्त फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यांसारखे प्रोडक्ट्स वापरले जातात. या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये, कमीतकमी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. जेणेकरून, आपल्या त्वचेवर जास्त प्रोडक्ट्सचा भार पडू नये. यामुळे त्वचेला श्वास घेण्याचीही संधी मिळते.


स्किन फास्टिंगचे फायदे जाणून घ्या


स्किन फास्टिंग (Skin Fasting) केल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. यामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक लूक (Natural Look) येतो. स्किन फास्टिंगने आपली त्वचा स्वतःचे संतुलन राखते. त्याची खास गोष्ट अशी आहे की कोणताही स्किन टोन असलेला कोणीही हा ट्रेंड फॉलो करू शकतो. तुम्ही काही दिवस किंवा आठवडे स्किन फास्टिंग करू शकता.


'या' गोष्टी लक्षात ठेवा


त्वचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोणत्याही सौंदर्याचा ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित माहिती असणे आवश्यक आहे. कोरडी त्वचा असलेल्या लोकांना सीरम किंवा टोनरची समस्या येऊ शकते. त्वचेला निर्जलीकरण देखील जाणवू शकते. मुरुम फुटणे, पिगमेंटेशन आणि एजिंग स्किन यामुळे त्रस्त असलेल्यांनी त्वचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच स्किन फास्टिंग करावा. तुम्हीसुद्धा हा स्किन फास्टिंग ट्रेंड फॉलो करू शकता. 


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी