Shri Ram Life Lessons For Children : 22 जानेवारीला अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा (Shri Ram) प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरातूल येणाऱ्या भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतेय. कारण भगवान राम हे हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक मानले जातात. सनातन धर्मात श्रीरामाची भूमिका महत्त्वाची आहे. श्री राम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. प्रभू श्री रामपासून लोक इतके प्रभावित आहेत की आजही लोक त्यांना आपला आदर्श मानतात. त्यामुळे श्रीरामांच्या जीवनाशी संबंधित कथा अनेक घरांमध्ये मुलांना नक्कीच सांगितल्या जातात. श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित या गोष्टी मुलांना यशस्वी करण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फार उपयुक्त आहेत.

  


1. कठीण काळातही संयम राखणे


श्री राम त्यांच्या संयमासाठी ओळखले जातात. अत्यंत कठीण प्रसंगातही ते संयमाने काम करायचे. रावणाने केलेलं सीतेचे अपहरण हे याचंच एक उदाहरण आहे. या दु:खाच्या काळातही त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. श्रीरामाच्या जीवनातील हे धडे तुम्ही तुमच्या मुलाला नक्कीच दिले पाहिजेत. आजकालच्या या व्यस्त जीवनात संयम बाळगणं खूप गरजेचं आहे. हे मूलभूत मंत्र तुमच्या मुलाच्या जीवनात खूप उपयुक्त ठरतील.


2. ज्येष्ठांचा आदर करणे


प्रभू श्री राम यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आई-वडिलांच्या आज्ञेनुसार व्यतित केलं. असे म्हटले जाते की जेव्हा त्यांना 14 वर्षांसाठी वनवासावर जाण्यास सांगितले तेव्हा त्यांनी त्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही आणि 14 वर्ष वडिलांना दिलेले वचन पाळले. श्रीरामाचे हे गुण तुम्ही तुमच्या मुलांना नक्की शिकवा.


3. नेहमी तुमची योजना ठरवा 


आजकाल आपण कोणतेही काम करताना खूप घाई करतो. या नादात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलांना शिकवले पाहिजे की कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण योजना आखमं गरजेचं आहे.  


4. गोष्टी स्वीकारायला शिका


बर्‍याच वेळा, आपण अनेक प्रयत्न करूनही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत किंवा एखादी गोष्ट आपण साध्य करू शकत नाही. अशा वेळी अर्थातच आपल्यला निराश व्हायला होतं. परंतु तुम्ही तुमच्या मुलाला ही कठीण परिस्थिती स्वीकारायला शिकवू शकता जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास कमी होणार नाही आणि पुढची कामे ते अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील.


5. लोकांसाठी सेवाभाव


तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी तुमच्या मुलांना सेवेची भावना शिकवा. त्यांना नेहमी त्यांच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकवा. श्री रामाच्या जीवनाशी संबंधित हे मूलभूत मंत्र तुमच्या मुलांना जीवनात यशस्वी करतील.