Shravan Somvar 2021 : हिंदू धर्मात विशेष महत्व असलेला श्रावण महिना हा सणवार, व्रतवैकल्यांचा महिना असतो. आजपासून हा पवित्र श्रावण महिना सुरु होत आहे. या महिन्यात विविध व्रतवैकल्य केली जातात. पूजा पाठ करण्यासाठी या महिन्याला विशेष महत्व आहे. यामुळं श्रावण  महिन्यात मांसाहारी खाणपान टाळलं जातं. श्रावण महिना भगवान शंकराला आणि आई पार्वतीला समर्पित केला जातो. जाणून घेऊया श्रावणाचं महत्त्व सांगणाऱ्या दहा महत्त्वाच्या गोष्टींबाबत... 


1. श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या पुजेला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, हा वर्षातील पाचवा महिना आहे आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार, श्रावण जुलै-ऑगस्टमध्ये येतो. 


2. या दरम्यान श्रावणी सोमवारच्या व्रताचं महत्त्व सर्वाधिक आहे. दरम्यान, श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. या महिन्यात सोमवारी व्रत केलं जातं श्रावण महिन्यात बेल पत्रानं भगवान शंकराची पूजा करणं आणि त्यांना जल अर्पण केल्यानं मन प्रसन्न राहतं. तसेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 


3. शिव पुराणानुसार, जी व्यक्ती या महिन्यात सोमवारचं व्रत करते, भगवान शंकर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. श्रावणात लाखो भाविक ज्योर्तिलिंगाचं दर्शन घेतात. हरिद्वार, काशी, उज्जैन, नाशिकसह भारतातील अनेक धार्मिक स्थळी भेट देतात. 


4. श्रावण महिन्याचा निसर्गाशी देखील जवळून संबंध आहे. कारण या महिन्यात वर्षा ऋतू असतो. सभोवतालचा परिसर हिरवळीची शाल पांघरलेला असतो.  ग्रीष्म ऋतूनंतर या महिन्यात पाऊस असल्यामुळे अल्हाददायी वारावरण असतं. याव्यतिरिक्त श्रआवण महिन्यात अनेक उत्सवही साजरे केले जातात. 


5. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांत (महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात) श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. 


6. श्रावणाच्या पवित्र महिन्यात शिवभक्तांद्वारे कावड यात्रेचं आयोजन केलं जातं. या दरम्यान, लाखो शिवभक्त उत्तराखंडमधील हरिद्वार आणि गंगोत्रीची यात्रा करतात. 


7. पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की, जेव्हा देव आणि दानवांमध्ये संमुद्र मंथन सुरु होतं, तेव्हा 14 रत्न बाहेर आली होती. त्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे, विष होतं. त्यामुळे सृष्टी नष्ट होण्याची भिती होती. तेव्हा सृष्टीच्या रक्षेसाठी भगवान शंकरांनी विष प्राशन केलं. शंकरांन हे विष आपल्या गळ्यात साठवलं, ते शरीरात उतरु दिलं नाही. विषाच्या प्रभावामुळे महादेवाचा कंठ निळा पडला आणि त्यामुळेच भगवान शंकराला निळकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. असं म्हटलं जातं की, रावणाची भगवान शिवशंकरावर निस्सीम भक्ती होती. रावणानं कांवरमध्ये जाऊन गंगाजल आणलं होतं, त्यानं भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक घातला होता. त्यानंतर भगवान शंकर यांना विषापासून मुक्ती मिळाली होती. 


श्रावणी सोमवार (Shravan Somvar) व्रत : श्रावण महिन्यात सोमवारच्या दिवशी जो व्रत केला जातो, त्याला श्रावणी सोमवारचा व्रत म्हटलं जातं. 


सोळा सोमवार व्रत : श्रावणासारख्या पवित्र महिन्यात सोळा सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात करणं अत्यंत शुभ मानलं जातं. 


प्रदोष व्रत : श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि आई पार्वती यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रदोष व्रत ठेवला जातो. 


9. श्रावणाचं ज्योतिष महत्त्व म्हणजे, श्रावण महिन्याच्या सुरुवातीला सूर्य राशी परिवर्तन करतो. सूर्याचे संक्रमण सर्व 12 राशींना प्रभावित करते. 


10.  श्रावण महिना भगवान शंकरासोबतच आई पार्वतीलाही समर्पित आहे. भक्त श्रावणात शुद्ध मनानं आणि श्रद्धेनं महादेवाचं व्रत करतात. वैवाहिक महिला आपलं वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आणि अविवाहित महिला चांगल्या वरासाठी भगवान शंकराचं व्रत करतात.