मुंबई: पेट्रोल भरताना बऱ्याचदा आपली फसवणूक होते असं म्हटलं जातं. पण खरंच असं होतं का? कारण की, पेट्रोल भरताना मीटरकडं आपलं लक्ष असतं. त्यामुळे आपली काही फसवणूक होईल असं आपल्या मनात येत नाही. पण काय आहे यामागील नेमकं सत्य जाणून घ्या.

 

सारखं सारखं नोजल दाबणं: पेट्रोल पंपावरी कर्मचाऱ्यारी पेट्रोल भरत असताना पेट्रोल भरण्याच्या पाईपाजवळील नोजल दाबत असल्यास नक्कीच गडबड आहे. कारण की, एकदा स्विच ऑन केल्यानंतर नोजल सारखं दाबणं म्हणजे तुमची नक्कीच फसवणूक होते आहे.

 

नोजलाचा संबंध हा थेट मीटरशी असतो. जर मीटरमध्ये 200 रुपयाचं पेट्रोल फीड केलं असेल तर एकदा नोजलचं स्विच दाबल्यानंतर 200 रुपयाचं पेट्रोल टाकल्यानंतर त्याचं स्विच आपोआप बंद होईल. स्विच फक्त मीटर ऑन करण्यासाठी असतो. फीड केलेली व्हॅल्यू संपल्यानंतर मीटर थांबतं.

 

पेट्रोल टाकताना जर नोजलचं स्विच बंद केलं तर मीटर चालू राहतं. मात्र, पेट्रोल बाहेर येत नाही. या गोष्टीचा फायदा घेऊन कर्मचारी पेट्रोल टाकताना मध्येमध्ये स्वीच बंद करतात. ज्यामुळे पेट्रोल टाकीमध्ये हळूहळू जातं.

 

200 रुपयाचं पेट्रोल भरण्यासाठी 30 ते 45 सेंकद लागतात. त्यामुळे आपलं सगळं लक्ष मीटरवर असतं. जर कर्मचारी 10 सेकंदासाठी स्विच बंद केलं तर समजा तुमच्या 50 रुपयांचं पेट्रोल कमी भरलं गेलं.

 

चिपमधून चोरी: पेट्रोलच्या मशीनमध्ये एक खास चीप बसवली जाते. त्याला रिमोटनं नियंत्रित केलं जातं. सेल्समन याला बटणानं कंट्रोल करतो. पेट्रोल भरताना बटण दाबल्यास पेट्रोल कमी पडतं. यानं मीटर तर सुरु राहतं मात्र तुम्हाला त्यापेक्षा कमी पेट्रोल मिळतं.

 

कधीही ठराविक किंमतीचं पेट्रोल भरु नका: कधीही 100, 200 किंवा 500 रुपयाचं पेट्रोल किंवा डिझेल भरु नका. नेहमी जरा वेगळ्या किंमतीचं पेट्रोल भरा. उदा. 104, 207 असं पेट्रोल भरा. कारण की, अनेक पेट्रोल पंपमध्ये मशीनशी छेडछाड करुन त्यांचा वेग वाढवतात. यामुळे मीटर जम्प करतं. जेव्हा तुम्ही ऑड नंबरचं पेट्रोल टाकतात त्यावेळी म्यॅनुअली पेट्रोल टाकावं लागतं आणि मीटरही जम्प होत नाही.

 

सुट्ट्या पैशांचा झोल: अनेकदा पेट्रोल भरण्यासाठी सकाळी सकाळी आपण जातो. त्यावेळेस कामावर जाण्याचीही घाई असते. बऱ्याचदा 200 किंवा 300 रुपयांचं पेट्रोल भरल्यानंतर 1000 रुपयाची नोट देतो. पण त्याचवेळस पैसे परत करताना अनेकदा ग्राहकाला कमी पैसे देतात. त्यामुळे पेट्रोल पंप सोडण्यापूर्वी नक्की पैसे मोजून घ्या.

 

पेट्रोल पंपावर या गोष्टीकडे लक्ष द्या: पेट्रोल भरण्यापूर्वी मीटरचं रिडींग शून्य असणं गरजेचं. भेसळ असल्याचा संशय असल्यास फिल्टर पेपर परीक्षण करण्याची मागणी करा. बील घेणं विसरु नका. काही गोष्टी खटकल्यास नक्की तक्रार करु शकतात.