Sankashti Chaturthi December 2021 : पंचांगानुसार, पौष महिन्याची पहिली आणि 2021 वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी ही आज (22 डिसेंबर 2021) आहे. या दिवशी अनेक शुभ योग आहेत. जाणून घेऊयात विशेष योग आणि शुभ मुहूर्त...
पुष्य नक्षत्र (pushya nakshatra)
ज्योतिषशास्त्र आणि पौराणिक ग्रंथांमध्ये पुष्य नक्षत्र हा सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो.पुष्य नक्षत्र हा सर्वात शुभ नक्षत्र मानला जातो. या नक्षत्रात केलेल्या कार्याचे फळ चांगले मिळते. त्यामुळे लोक शुभ कार्य करण्यासाठी या नक्षत्राची वाट पाहातात.
कर्क राशीत चंद्राचे संक्रमण(Moon transit in Cancer)
22 डिसेंबर 2021 रोजी पंचांगानुसार चंद्र कर्क राशीत राहील.ज्योतिषशास्त्रात चंद्राला कर्क राशीचा स्वामी म्हटले आहे. म्हणजेच या दिवशी चंद्र स्वतःच्याच राशीत राहणार आहे. हा राजयोग आहे. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. भगवान शंकराच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे.
संकष्टी चतुर्थी 2021 (sankashti chaturthi 2021)
कॅलेंडरनुसार,प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी आसतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात.
गणपतीची पूजा
आज गणपतीची विधि पूर्वक पूजा करा. त्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
बुधवारी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व (Sankashti Chaturthi 2021)
या महिन्यात संकष्टी चतुर्थी ही बुधवारी आली आहे. बुधवार हा गणपतीला समर्पित केला जातो. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. संकष्टी चतुर्थीला अनेक लोक उपवास करतात. चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर उपवास सोडला जातो. पंचांगानुसार चतुर्थीच्या तिथीची सुरूवात दुपारी 4 वाजून 54 मिनीटांना होणार आहे.
आज का राहुकाळ (Aaj Ka Rahu Kaal)
पंचांगानुसार 22 डिसेंबर 2021 रोजी राहुकाळ दुपारी 12.19 ते बुधवारी 1.36 पर्यंत राहील .राहुकाळामध्ये शुभ कार्य करू नये.
संकष्टी चतुर्थीच्या पूजेचा मुहूर्त (Sankashti Chaturthi Puja Muhurat 2021)-
चतुर्थी तिथि: 22 डिसेंबर 2021, बुधवार
पूजन मुहूर्त: रात्री 08:15 तो रात्री 09:15 पर्यंत (अमृत काळ)
चंद्र दर्शन मुहूर्त: रात्री 08:30 ते रात्री 09:30 पर्यंत
इतर बातम्या :