Rose Day 2024: आजपासून व्हेलंटाईन वीक (Valentine Week) सुरू झाला आहे. आज 7 फेब्रुवारी, रोज डेने व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) साजरा करुन प्रेमाचा सप्ताह संपणार आहे. आज रोड डेच्या (Rose Day) दिवशी आपल्या पार्टनरला गुलाबाचं फुल देऊन आजचा दिवस साजरा करतात, आपलं प्रेम व्यक्त करतात. हे सगळं एकीकडे आणि गुलाबाचे वाढणारे दर एकीकडे. संपूर्ण व्हॅलंटाईन वीकमध्ये गुलाबाच्या किमती गगनाला भिडलेल्या असतात. पण तुम्हाला माहितीय का? जगातील सर्वात महाग गुलाबाचं फुल लोकांना कोणत्या नावानं ओळखलं जातं आणि त्याची किंमत किती असते? 


एका गुलाबाच्या किमतीत 4 मोठे बंगले खरेदी कराल 


गुलाबाचं फूल प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. गुलाबाचं फुल अनेक प्रकारांमध्ये आणि रंगांमध्ये उपलब्ध आहे. पण तुम्हाला जगभरातील सर्वात महाग गुलाब माहितीय का? जगातील सर्वात महाग गुलाबाचं नाव आहे, ज्युलिएट रोज (Juliet Rose). ज्युलिएट रोज त्याच्या सुगंध, सौंदर्य आणि किंमतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आता तुम्ही म्हणाल, अशी किती किंमत असेल याची? 10 रुपये, 20 रुपये किंवा मग 100 रुपये... तर थांबा... तुम्ही चुकताय, ज्युलिएट रोजची किंमत कोटींमध्ये आहे. या गुलाबाच्या किमतीमध्ये तुम्ही मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यू कार किंवा तीन मोठे बंगले विकत घेऊ शकता. तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्यच नाहीतर अगदी गडगंज श्रीमंत असणारे लोकही हा गुलाब विकत घेताना शंभरदा विचार करतील. 



ज्युलिएट रोज, किती रुपयांना मिळतं?


जगातील सर्वात महागड्या गुलाबांमध्ये समाविष्ट होणारं ज्युलिएट रोज एवढं महाग का आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. ज्युलिएट रोजची किंमत 130 कोटी रुपये आहे. 2006 मध्ये जगाला पहिल्यांदा ज्युलिएट रोजची ओळख झाली. 


भूरळ घालतं याचं सौंदर्य 


प्रसिद्ध रोज ब्रीडर डेविड ऑस्टिननं जगासमोर सर्वात आधी ज्युलिएट रोज सादर केलं. रोज ब्रीडरनं अनेक गुलाबांच्या प्रजाती संकरित करुन ज्युलिएट रोज तयार केलं होतं. त्यावेळी हे गुलाब तब्बल 90 कोटींना विकण्यात आलं होतं. 


ज्युलिएट रोज एवढं महाग का?


ज्युलिएट रोजची किंमत ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की, या गुलाबात नक्की आहे काय? एवढं महाग का? हे गुलाब उगवण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा वेळ लागतो आणि 5 मिलियन डॉलर्स (जवळपास 34 कोटी रुपये) लागतात. डेविड ऑस्टिनच्या वेबसाईटनुसार, ज्युलिएट रोजचा सुगंध चहाच्या गंधाप्रमाणे असतो. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rose Day: लाल गुलाब प्रेमाचा, तर पिवळा मैत्रीचा, गुलाबाच्या पाच रंगांचा अर्थ काय? 'रोज डे' च्या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचे गुलाब द्याल?