Surya Grahan 2023 : 2023 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आज होणार आहे. आज शनिश्चरी अमावस्याही आहे. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहणाचा हा योगायोग 100 वर्षांनंतर घडत आहे. सूर्यग्रहणाची नेमकी वेळ, शुभ संयोग, त्याचा परिणाम जाणून घ्या
सूर्यग्रहणाची वेळ
भारतीय वेळेनुसार 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:34 वाजता होणार आहे. दुपारी 2.25 वाजता संपेल. या सूर्यग्रहणाची मध्यवर्ती वेळ रात्री 11:29 वाजता असेल, या दरम्यान ग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 51 मिनिटे असेल. 14-15 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी सूर्यग्रहण होईल.
असे पाहा सूर्यग्रहण
आज होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, पण ते थेट ऑनलाइन पाहता येईल. हे तुम्ही वर्च्युअल टेलीस्कोपद्वारे देखील पाहू शकता. याशिवाय नासाच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन सूर्यग्रहणाचे थेट कव्हरेज पाहता येईल.
ग्रहण काळात या गोष्टी करा
ज्योतिषशास्त्रानुसार, आज काही उपाय करून सूर्यग्रहणाचे अशुभ परिणाम टाळता येतील.
सूर्यग्रहण काळात देवाची मनोभावे पूजा करावी.
गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे देखील फायदेशीर आहे.
असे केल्याने ग्रहणाचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडणार नाही.
ग्रहणकाळात नारळ जवळ ठेवा आणि ग्रहण संपल्यानंतर ते वाहत्या पाण्यात सोडा.
यामुळे ग्रहणाचा प्रभाव नाहीसा होतो.
सूर्यग्रहणाचा या राशींवर पडेल नकारात्मक प्रभाव
ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक राशींना आज होणाऱ्या ग्रहणाचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. आजचे ग्रहण मेष, सिंह, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान, अपघाताचा फटका देखील सहन करावा लागू शकतो. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी.
ग्रहण काळात ही काळजी घ्या
असे मानले जाते की, ग्रहण काळात नकारात्मक शक्ती सक्रिय होतात. त्यामुळे ग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळावे. ग्रहण काळात काहीही खाऊ नये आणि शिजवू नये. गर्भवती महिलांनी विशेष खबरदारी घ्यावी. धारधार वस्तू जवळ बाळगू नये. आज अमावस्या देखील आहे, त्यामुळे या दिवशी निर्जन ठिकाणी जाणे टाळावे.
सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी
सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. या काळात पूजा आणि कोणत्याही शुभ कार्यावर बंदी घालण्यात आली आहे. आज होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे येथे सुतक कालावधीही वैध राहणार नाही.
या ठिकाणी सूर्यग्रहण दिसणार
आजचे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, कॅनडा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, ग्वाटेमाला, मेक्सिको, अर्जेंटिना, कोलंबिया, क्युबा, बार्बाडोस, पेरू, उरुग्वे, अँटिग्वा, व्हेनेझुएला, जमैका, हैती, पॅराग्वे, ब्राझील आणि डोमिनिका या देशांमध्ये दिसणार आहे. ते भारतात दिसणार नाही.
सूर्यग्रहण आणि शनि अमावस्या यांचा विशेष संयोग
आज शनि अमावस्याही आहे. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहणाचा हा योगायोग 100 वर्षांनंतर घडत आहे. शनिदोष, शनीची साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात.
सूर्यग्रहणाची वेळ
आज होणारे सूर्यग्रहण अनेक अर्थाने विशेष असणार आहे. आज शनिवारी होणारे हे ग्रहण रात्री 8:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता संपेल.
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आज होणार
आज वर्षातील दुसरे सूर्यग्रहण होणार आहे. या सूर्यग्रहणात 'रिंग ऑफ फायर' दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण आज कन्या आणि चित्रा नक्षत्रातील अमावस्या तिथीला होईल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, जे भारतात दिसणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Surya Grahan 2023 : आज वर्षातील दुसरे सूर्यग्रहण होणार, कोणत्या राशीवर होणार परिणाम? भारतात दिसणार का? जाणून घ्या