= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ganeshostav 2023 : लालबागचा राजा आणि दगडूशेठला तुफान गर्दी Ganeshostav 2023 : पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन आणि त्यातच विकेंड आल्यामुळे लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपतींना भाविकांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ganesh Visarajan 2023 : नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणुकांना सुरुवात Ganesh Visarajan 2023 : नंदुरबारमधील 278 सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. पारंपारिक वाद्याच्या तालावर गुलालाची उधळण करत गणरायाला निरोप दिला जातोय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ganpati Visarjan : कोकणात पारंपारिक पद्धतीने बाप्पाला निरोप Ganpati Visarjan : कोकणात ढोल ताशांच्या गजरात अगदी पारंपारिक पद्धतीने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ganpati Visarjan : पाच दिवसाच्या बाप्पांना निरोप Ganpati Visarjan : राज्यभरात आज गौरी गणपती तसेच पाच दिवसांच्या घरगुती गणपतींना निरोप देण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Amit Shah : केंद्रीय गृहमंंत्री अमित शाह बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षा बंगल्यावर Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Lalbaugcha Raja : बॉलिवूडचा किंग खान लालबागच्या राजाच्या चरणी Lalbaugcha Raja : अभिनेता शाहरुख खान याने मुलासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहचले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Ganeshotsav 2023 : पुण्याचा मानाचा पाचवा तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला; 11:30 मिनीटांनी गणरायाची प्रतिष्ठापना होणार Pune Ganeshotsav 2023 : पुण्याचा मानाचा पाचवा तुळशीबाग (Pune Ganeshotsav 2023 )गणपतीच्या मिरवणुकीला काहीवेळापूर्वी सुरुवात झाली. पारंपारिक पद्धतीने पालखीतून गणरायाच्या मिरणुकीला सुरुवात झाली. भाविक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. दि पूना मर्चंट्स चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया आणि जयराज अँन्ड कंपनीचे राजेश शहा यांच्या हस्ते सकाळी 11:30 मिनीटांनी गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Ganeshotsav 2023 : मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात Pune Ganeshotsav 2023 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Pune Ganeshotsav 2023 : )सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठापना होत आहे प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती होईल आणि त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुला करण्यात येईल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Ganeshotsav 2023: कलाकारांच्या ढोल वादनाने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात Pune Ganeshotsav 2023 : भव्य दिव्य देखाव्यांसाठी (Pune Ganeshotsav 2023 ) प्रसिध्द असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली आहे. कलावंत पथकाच्या गजरात या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. अनेक मराठी कलाकार या मिरवणुकीत ढोल ताशाच्या वादनाचा अनुभव या मिरवणुकीत घेत आहे. यंदा काल्पनिक ‘ॐकार महाल’ हा देखावा साकारण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Tambdi Jogeshwari: मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणुकीला सुरुवात Tambdi Jogeshwari: मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणुकीला सुरुवात झाला आहे. ढोल ताशाच्या गजरात पालखीतून मिरवणूक काढली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Ganeshotsav 2023 : ढोल ताशाच्या गजरात मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात Pune Ganeshotsav 2023 : पुण्यातील मानाच्या दुसऱ्या (Pune Ganeshotsav 2023 ) म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. शेकडो वादक आणि पुणेकर या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 : 50 ला होणार आहे. श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज आणि सज्जनगड येथील भूषण महारुद्रा स्वामी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Ganeshotsav 2023 : मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात... Pune Ganeshotsav 2023 : पुण्यातील ग्रामदैवत असलेल्या आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या (kasba Ganpati) मिरवणुकीला ढोल ताशा आणि सनई चौघड्यांच्या जल्लोषात सुरुवात झाली आहे. या मंदिरासमोरच गणपतीचा मंडप उभारण्यात आला आहे. मिरवणूक संपल्यानंतर पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11:37 ला होणार आहे. डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला पारंपारिक पद्धतीने सुरुवात, मोहन भागवतांच्या हस्ते होणार प्रतिष्ठापना Pune Ganeshotsav 2023 : गणपती बाप्पा मोरयाच्या (Pune Ganeshotsav 2023) जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली. रितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात सुरु झाली आहे. कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या या प्रतिकृती बाप्पा विराजमान होतील सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत गणेश भक्त उपस्थित होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Kokan Ganesh Chaturthi: तळकोकणात शेतीच्या बांधावरून, होडीतून लाडक्या बाप्पांचं आगमन Kokan Ganesh Chaturthi: कोकणातील सर्वात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोकणात घरोघरी गणपती बाप्पाची आज प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. कोणी शेतीच्या बांधावरून डोक्यावर बाप्पांची मूर्ती घेऊन येत आहेत तर कोणी होडी मध्ये बाप्पांची मूर्ती ठेवून खाडी, नदी पार करून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत. कोकणात आज बापांच्या प्राणप्रतिष्ठापनेची लगबग घरोघरी पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात 71798 घरात बाप्पांचं आगमन होत असून मोठ्या भक्तिभावाने बापांची प्राणप्रतिष्ठापना केली जातं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Malegaon Ganeshotsav : चित्तथरारक कसरती करत श्रीगणेशाचे आगमन Malegaon Ganeshotsav : आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालीये. नाशिकच्या मालेगावातील संगमेश्वर येथील सावता गणेश मंडळाच्या 23 फुटी गणपती बाप्पाच्या मूर्तीचं आगमन मोठ्या उत्साहात संपन्न झालं. भगवान महादेव, हनुमान यांच्या जिवंत अशा बाहुबली प्रतिकृती देखाव्याने सर्वांचे लक्ष या मिरवणुकीत वेधून घेतलं. ढोल ताशांचा गजर, योगा नृत्य, आदिवासी नृत्य अशा विविध प्रकार या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण ठरलं.

Ganesh Utsav 2023: संस्थान गणपतीची प्राणप्रतिष्ठा, छत्रपती संभाजीनगरचं आराध्य दैवत Ganesh Utsav 2023: राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थान गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेनंतरच शहरात सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरूवात होत असते. त्यामुळे संस्थान गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेला भाविकांनी गर्दी केल्याच पहायला मिळालं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
pune ganeshotsav 2023 : जल्लोष अन् ढोल वादनात पुण्यात गणपती मिरवणुकीला सुरुवात pune ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाला आजपासून (pune ganeshotsav 2023) जल्लोषात सुरुवात होणार आहे. या गणेशोत्सवासाठी पुणे सज्ज झालं आहे. सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येत आहे. तर ढोल ताशा पथकंदेखील मिरवणूक गाजवायला सज्ज झाले झाले आहे. संपूर्ण पुण्यात मंगलमय वातावरण झालं आहे. तर पुण्यातील प्रत्येक घरात आता बाप्पाची ओढ दिसत आहे. यातच पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुकी पाहण्यासाठी अनेक पुणेकर लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यांवर एकत्र यायला सुरुवात झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ganesh Chaturthi: लाडक्या बाप्पाच्या सजावटीसाठी फुलांची खरेदी करण्यासाठी दादरच्या फुल मार्केटमध्ये गर्दी Ganesh Chaturthi: गणेश उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीसाठी फुलांची खरेदी करण्यासाठी दादरच्या फुल मार्केटमध्ये गर्दी झाल्याचं पहायला मिळतंय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Sangli Ganesh Chaturthi: सांगलीतील विसावा गणेश मंडळ पारंपारिक पध्दतीने लेझीम खेळत गणरायाचे स्वागत Sangli Ganesh Chaturthi: गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया... आज राज्यासह देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय. सांगलीतील विसावा गणेश मंडळ पारंपारिक पध्दतीने लेझीम खेळत गणरायचे करते स्वागत केलं. महिनाभर ज्येष्ठ पुरुष, महिला, लहान मुलं, तरुण-तरुणी जोरदार सराव करत असतात,
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nagpur Tekdi Ganpati: नागपूरच्या टेकडी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी Nagpur Tekdi Ganpati: नागपूरच्या टेकडी गणपतीच्या दर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वत्र बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात देखील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय. सकाळी आरती करुन या गणेशोत्सवाला सुरुवात झाली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbaicha Raja: मुंबईच्या राजाची दर्शन रांग भाविकांसाठी खुली Mumbaicha Raja: मुंबईच्या राजाची आज सकाळीच प्राणप्रतिष्ठा पार पडली. यानंतर आता दर्शन रांग खुली करण्यात आली आहे. यंदा या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आकर्षक देखावा करण्यात आला आहे. यासोबतच रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ganesh Utsav 2023: चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मुखदर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांच्या रांगा Ganesh Utsav 2023: आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालीय. देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. तर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या प्राण प्रतिष्ठेला सुरुवात झालीये. त्याआधीच मुखदर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ganesh Utsav 2023: विलेपार्लेच्या मोरया गणपतीचं आगमन, गणेशोत्सवानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन Ganesh Utsav 2023: गणेश उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. मुंबईच्या जुहू परिसरात असलेल्या विलेपार्लेचा मोरया या गणपतीचं आगमन झालं आहे. विलेपार्लेच्या मोरयाचं यंदा चौदावं वर्ष आहे. मंडळाकडून दहा दिवस वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची पहाटे पाच वाजता प्राणप्रतिष्ठा Lalbaugcha Raja : मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतींपैकी एक म्हणजे लालबागचा राजा.. लालबागच्या राजाची पहाटे 5 वाजता प्राणप्रतिष्ठा झाली. विधीवत पूजा झाल्यानंतर लालबाग राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळी सहा वाजल्यापासूनच रांग लागली आहे.