Ganesh Chaturthi 2023 Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, गणेश चतुर्थीच्या आधी बुधाच्या (Venus) चालीमध्ये मोठा बदल होत आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा व्यापार, दळणवळण आणि वादाचा कारक मानला जातो. बुध ग्रह प्रसन्न होण्यासाठी गणेशाची पूजा केली जाते. बुध ग्रहाची पूजा केल्याने हा ग्रह शुभ फल प्रदान करतो. बुधाच्या बदलामुळे काही राशींना श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे.


 


बुध ग्रहाचा प्रभाव
तुमच्या पत्रिकेत बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीला बुद्धिमान बनवतो. बुधाची मजबूत स्थिती व्यक्तीला सक्षम आणि गोड वाणी देते. तसेच कमकुवत बुध तुमची क्षमता बिघडवू शकतो. यामुळे त्वचेशी संबंधित रोग देखील होऊ शकतो. 16 सप्टेंबर 2023 रोजी थेट सिंह राशीत जाणारा बुध तुमच्या राशीवर काय प्रभाव टाकणार आहे? हे जाणून घ्या.


 


मेष
बुध, तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी असल्याने पाचव्या भावात स्थान बदलेल. यामुळे तुमचा बौद्धिक विकास आणि ज्ञान वाढेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला समाजातील काही प्रभावशाली लोक भेटतील, जे तुमच्यासाठी भविष्यात शुभ ठरतील. कामाच्या ठिकाणी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात, तसेच तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत घेऊ शकता.


उपाय- बुधवारी श्रीगणेशाच्या मंदिरात श्री गणेशाला दुर्वा आणि लाल फुले अर्पण करा. तसेच तिथे बसून ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 13 वेळा जप केल्यानंतर काही दुर्वा आणि लाल फुले घरी आणून पूजा कक्षात ठेवा. गणपती तुमच्या मनोकामना पूर्ण करेल.


 


वृषभ


बुध दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी असल्याने चौथ्या भावात प्रवेश करेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवू शकाल. तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता किंवा तुमचे जुने घर दुरुस्त करून घेऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुम्ही कठोर परिश्रम कराल, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. विद्यार्थ्यांनी चिकाटीने व शांततेने अभ्यास करावा अन्यथा काही अडचणी येऊ शकतात.
 
उपाय- बुधवारी बुध ग्रहाच्या ओम बुं बुधाय नमः मंत्राचा जप केल्याने बुध मजबूत होईल.


 
मिथुन


तुमच्या राशीचा स्वामी आणि चौथ्या भावात बुध ग्रह तिसऱ्या भावात जाईल. तुमची काम करण्याची क्षमता वाढेल. ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकाल. यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. घरातील सदस्याची तब्येत बिघडल्याने तुमचे मन चिंतेत राहील, विद्यार्थ्यांना अभ्यासात मित्रांकडून मदत मिळेल, जे परीक्षेत फायदेशीर ठरेल.
 
उपाय- बुधवारी रामायणातील किस्किंध कांडाचे पठण करा.



 
कर्क 
तिसऱ्या आणि बाराव्या घराचा स्वामी बुध दुसऱ्या भावात जाईल. व्यवसायात तुम्हाला परदेशातून फायदा होऊ शकतो. भावंडांकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला जे काम दिले जाईल, त्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम दिसून येईल. घरामध्ये छान वेळ जाईल. विद्यार्थ्यांनी रागावर नियंत्रण न ठेवल्यास त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
 
उपाय- बुधवारी रात्री डोक्याजवळ नारळ ठेवा आणि झोपा. आणि दुसऱ्या दिवशी तोच नारळ काही दक्षिणा सोबत गणेशाच्या मंदिरात अर्पण करा. तसेच विघ्नहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करावे.



 
सिंह


बुध, दुस-या आणि 11व्या घराचा स्वामी असल्यामुळे, तुमच्या राशीत मार्गी होईल. समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या भाषाशैलीमध्ये सुधारणा असेल. ज्यामुळे तुम्ही लोकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या आवडत्या ठिकाणी सुट्टीवर जाऊ शकता. आपल्या जोडीदाराची आपल्या पालकांशी ओळख करून देण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. 
 
उपाय- बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घाला आणि तृतीय पंथीयांना दान करा.
 


कन्या


तुमच्या राशीचा स्वामी आणि 10व्या घरातील बुध 12व्या भावात मार्गी होईल. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही दुसऱ्या शहरात जाल, जे तुमच्यासाठी शुभ राहील. ज्या गोष्टींची तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे त्यावरच तुम्ही खर्च करा, अन्यथा तुमचा खर्च वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि बाहेरचे अन्न खाऊ नका. कामाच्या ठिकाणी सावधगिरीने काम करा, अन्यथा काही समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.
 
उपाय- बुधवारी नारळ, ओढणी, कापूर आणि लाल फुलांची माळ अर्पण करून दुर्गादेवीची पूजा करा. कपड्याच नारळ गुंडाळा आणि दक्षिणासह देवीच्या चरणी अर्पण करा.



 
तूळ 


9व्या घराचा आणि 12व्या भावाचा स्वामी बुध 11व्या भावात जाईल. तुम्हाला काही गुप्त स्त्रोतांकडून पैसे मिळतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. जर तुम्ही ऑटोमोबाईल किंवा कपड्यांच्या व्यवसायात गुंतलेले असाल तर तुमच्यासाठी वेळ चांगला जाणार नाही. तुमचे जवळचे लोक तुमच्या बोलण्याने विशेषतः प्रभावित होतील. जर तुम्ही मीडिया चॅनेल किंवा संवाद क्षेत्राशी संबंधित असाल तर ते तुमच्यासाठी शुभ राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित समस्या कमी होतील आणि नवीन संबंधित कामात यश मिळेल.
 
उपाय- बुधवारी सकाळी गणपतीला 11 किंवा 21 जुड्या दुर्वा अर्पण करा.
 
वृश्चिक - 8व्या आणि 11व्या घराचा स्वामी बुध 10व्या भावात जाईल. नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. त्यांच्याशी बोलताना काळजी घ्या. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या वादात अडकणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कौटुंबिक जीवनात नातेसंबंधांसाठी वेळ काढावा लागेल. यामुळे तुमच्यामध्येही सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. वडिलांची तब्येत बिघडू शकते त्यामुळे तुमचे मन अशांत राहील. 


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


 


संबंधित बातम्या


Hartalika 2023 : हरतालिका कधी आहे? विवाहित, अविवाहित स्त्रियांसाठी महत्त्वाचे व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, शुभ योगबद्दल